Home » ठळक बातम्या » वाई एमआयडीसी हादरली; फाउंड्रीच्या जळत्या भट्टीत उडी घेऊन कामगाराची आत्महत्या

वाई एमआयडीसी हादरली; फाउंड्रीच्या जळत्या भट्टीत उडी घेऊन कामगाराची आत्महत्या

वाई एमआयडीसी हादरली; फाउंड्रीच्या जळत्या भट्टीत उडी घेऊन कामगाराची आत्महत्या

वाई, दि. १९ : वाई एमआयडीसी परिसरातील एका नामांकित फाउंड्री कंपनीत शनिवारी (दि. १८) पहाटे अत्यंत धक्कादायक घटना घडली. झारखंडमधील ४२ वर्षीय कामगाराने चालू असलेल्या धगधगत्या मेटल भट्टीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने औद्योगिक परिसरात खळबळ उडाली आहे.

मृत कामगाराचे नाव दुर्गा रोहिता प्रधान (वय ४२, मूळ रा. राजाबासा, ता. टेटटांगर, जि. सिंहभूम, झारखंड; सध्या रा. वाई एमआयडीसी परिसर) असे आहे.

प्राथमिक माहितीनुसार, दुर्गा प्रधान हे गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास फाउंड्रीमध्ये काम सुरू असताना त्यांनी अचानक धगधगत्या मेटल भट्टीत उडी घेतली. हा प्रकार लक्षात येताच सहकाऱ्यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, भट्टीतील तीव्र उष्णता आणि प्रचंड तापमानामुळे त्यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच वाई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह बाहेर काढून वाई ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, त्यांच्या झारखंड येथील नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पुरावे व नमुने गोळा केले आहेत. दुर्गा प्रधान यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणामुळे उचलले, याचा तपास सुरू असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस अधिक तपास करत आहेत.

टीप : आत्महत्येच्या घटनांचे वृत्तांकन करताना कारणांबाबत अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे योग्य नाही. जर आपण किंवा आपल्या परिचयातील कोणी मानसिक तणावाचा सामना करत असेल, तर विश्वासू व्यक्ती, कुटुंबीय किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घेणे महत्त्वाचे आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

न्यायिक सेवा पूर्व प्रशिक्षणासाठी वकिलीचा अनुभव ३ वर्षांवरून १ वर्ष

न्यायिक सेवा पूर्व प्रशिक्षणासाठी वकिलीचा अनुभव ३ वर्षांवरून १ वर्ष सामायिक चाळणी परीक्षा-२०२६ च्या ऑनलाइन अर्जात सुधारणा पुणे, दि.२८: महाराष्ट्र

Live Cricket