Home » राज्य » प्रशासकीय » वाई- कुसगाव क्रशरबाबत मकरंद पाटील यांची भूमिका ग्रामस्थांच्या बाजूची: शिंदे

वाई- कुसगाव क्रशरबाबत मकरंद पाटील यांची भूमिका ग्रामस्थांच्या बाजूची: शिंदे

वाई- कुसगाव क्रशरबाबत मकरंद पाटील यांची भूमिका ग्रामस्थांच्या बाजूची: शिंदे

दि. ७/८/२०२५ : कुसगाव येथील क्रशरचा मुद्दा पुढे करून वैयक्तिक स्वार्थ साधण्याचा,राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे. क्रशर प्रश्नात मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची भूमिका कायम ग्रामस्थांच्या बाजूचीच राहील, असे वाई तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

पत्रकात म्हटले आहे, नामदार पाटील यांनी कधीही टोकाचे राजकारण केले नाही. कुसगावसह वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांबद्दल त्यांच्या मनात विशेष आस्था राहिली आहे. विकास कामे करतानाही या विभागाकडे त्यांचे अधिकचे लक्ष असते. क्रशरबाबत त्यांनी पार्टेवाडी- एकसर व सातारा येथे बैठका घेतल्या आहेत.नामदार पाटील यांच्या सूचनेनुसारच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वाकड, पुणे येथे जाऊन आंदोलकांशी सकारात्मक चर्चा केली. त्यानंतर चौकशी करण्यास जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केले. त्यानंतर समितीमार्फत क्रशरबाबत वस्तुस्थिती तपासण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी क्रशर, खाणपट्ट्याचे काम बंद ठेवण्याचे आदेशही दिले आहेत. मकरंद पाटील यांची राजकीय वाटचाल शाहू, फुले, आंबेडकर यांच्या

सर्वसमावेशक विचारधारेस अनुसरून आहे, त्यामुळे कुसगाव परिसरातील जनता,अशा धादांत खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही.या प्रश्नावर चुकीचे,बिनबुडाचे आरोप करून कोणीही राजकारण करू नये.असे करणाऱ्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही पत्रकात श्री. शिंदे यांनी दिला आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

न्यू एरा हायस्कूल, पाचगणी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘आर्ट मेला’चे आयोजन

न्यू एरा हायस्कूल, पाचगणी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘आर्ट मेला’चे आयोजन पाचगणी प्रतिनिधी-न्यू एरा हायस्कूल, पाचगणी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त इयत्ता पहिली

Live Cricket