Home » राज्य » शिक्षण » वाई फेस्टिवल २०२५ : जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत शंतनू येवले ‘उत्कर्ष श्री’

वाई फेस्टिवल २०२५ : जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत शंतनू येवले ‘उत्कर्ष श्री’

वाई फेस्टिवल २०२५ : जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत शंतनू येवले ‘उत्कर्ष श्री’

उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाई व वाई जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वाई फेस्टिवल २०२५ यंदा आपल्या १८ व्या वर्षात पदार्पण करीत असून हा भव्य उत्सव दिनांक ०७ डिसेंबर २०२५ ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत विविध सांस्कृतिक, क्रीडा व मनोरंजनात्मक उपक्रमांनी साजरा होत आहे.

या फेस्टिवलच्या अंतर्गत शुक्रवार, दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी सातारा जिल्हा शरीरसौष्ठव संघटना व वाई तालुका शरीरसौष्ठव संघटना यांच्या सहकार्याने जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन वाई येथील महागणपती घाटाच्या भव्य प्रांगणावर करण्यात आले. सदर स्पर्धा एकूण ६ वजनी गटांमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. यामध्ये ५० ते ५५ किलो वजनी गटात प्रथम – आकाश देसाई (कराड)

द्वितीय – प्रथमेश भिसे (वाई) तृतीय – शंतनू कुंभार (वाई) चतुर्थ – सूरज नेवसे (शिरवळ) पाचवा – साहिल थोरवे (वाई), ५५ ते ६० किलो वजनी गटात प्रथम – शंतनू येवले (वाई) द्वितीय – राहुल कुसाळकर (फलटण) तृतीय – दिनेश पिसाळ (बरड) चतुर्थ – उदय शिंदे (वाई) पाचवा – यश नायकवाडी (वाई), ६० ते ६५ किलो वजनी गटात प्रथम – उदय कदम (शिरवळ) द्वितीय – अनिकेत गुळूमकर (शिरवळ) तृतीय – अजय देसाई (वाठार) चतुर्थ – शिव देशमुख (सातारा) पाचवा – जयेश सावंत (वाई), ६५ ते ७० किलो वजनी गटात प्रथम – संतोष वाडेकर (शिरवळ) द्वितीय – संजय मोर (फलटण) तृतीय – केसर ठाकूर (कराड) चतुर्थ – प्रविण खराटे (फलटण) पाचवा – अजय उबाळे (फलटण), ७० ते ७५ किलो वजनी गटात प्रथम – अनिरुद्ध पवार (वाई) द्वितीय – सतीश वाडकर (सातारा) तृतीय – अभिजीत चव्हाण (कोरेगाव) चतुर्थ – नीलेश माने (कराड) पाचवा – आफाज शेख (सातारा), ७५ किलोवरील खुला वजनी गटात प्रथम – रोहित गजरे (कराड) द्वितीय – अक्षय वाकोडे (फलटण) तृतीय – अजिंक्य महामुनी (वाई) चतुर्थ – अनिकेत नायकवाडी (वाई) पाचवा – सूरज क्षीरसागर (वाई), मेन्स फिजिक – विशेष गटात प्रथम – सुलेमान मोमीन (कराड) द्वितीय – सूरज भोसले (फलटण) तृतीय – नितीन भोसले (वाई) चतुर्थ – सूरज साळुंखे (फलटण) पाचवा – अनिरुद्ध चौधरी (फलटण) यांना विजेतेपद मिळाले. वाई फेस्टिवल २०२५ चा “बेस्ट पोजर” हा मान अनिस शेख , कराड यांना मिळाला, तर “उत्कर्ष श्री २०२५” हा मानाचा किताब वाईचा शंतनू येवले यांनी पटकाविला. या प्रसंगी वाई फेस्टिवल २०२५ चे अध्यक्ष श्री. संजय वाईकर, कोषाध्यक्ष ॲड. रमेश यादव , सचिव श्री सुनील शिंदे व निमंत्रक श्री. अमर कोल्हापुरे यांनी सर्व खेळाडू, परीक्षक, आयोजक व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास श्रीमती अनुराधा कोल्हापुरे, श्रीमती मंगला अहिवळे,श्री श्रीकांत शिंदे, श्री वैभव फुले, श्री भूषण तारू, श्री सागर मुळे, श्रीमती अलका घाडगे, श्रीमती नीला कुलकर्णी, सौ. प्रीती कोल्हापुरे, श्री अमीर बागूल,श्री नितीन वाघचौडे श्री तुकाराम जेधे, श्री प्रशांत मांढरे, श्री प्रणव गुजर व श्री परवेज लाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई फेस्टिवल २०२५ : जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत शंतनू येवले ‘उत्कर्ष श्री’

Post Views: 38 वाई फेस्टिवल २०२५ : जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत शंतनू येवले ‘उत्कर्ष श्री’ उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाई

Live Cricket