अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » प्रशासकीय » वाई विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) अध्यक्षपदी अॅड. निलेश डेरे यांची निवड

वाई विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) अध्यक्षपदी अॅड. निलेश डेरे यांची निवड

वाई विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) अध्यक्षपदी अॅड. निलेश डेरे यांची निवड

वाई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे तसेच माजी सहकार मंत्री व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा नेतृत्व अॅड. निलेश डेरे यांची वाई विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

यावेळी श्री. राजकुमार पाटील, श्री. नरेश देसाई, श्री. नितीन शिंदे, श्री. संतोष पवार, श्री. दत्तात्रय पवार, श्री. सोमनाथ जाधव, श्री. अक्षय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

अॅड. निलेश डेरे हे माजी खासदार श्रीनिवास पाटील यांचे निकटवर्ती मानले जात असून पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू व सक्रिय युवा नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. संघटनात्मक कामकाज, कार्यकर्त्यांशी सातत्यपूर्ण संपर्क आणि पक्षवाढीसाठी केलेल्या कार्यामुळे त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

नियुक्तीनंतर अॅड. निलेश डेरे यांनी पक्ष नेतृत्वाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व वरिष्ठ नेते व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच वाई विधानसभा मतदारसंघात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या निवडीमुळे वाई विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket