Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » हिंदवी’त विद्यार्थ्यांवर मनःशक्ती प्रयोग लोणावळा येथील केंद्राद्वारे अभ्यासाच्या सोप्या पद्धतीची कार्यशाळा

हिंदवी’त विद्यार्थ्यांवर मनःशक्ती प्रयोग लोणावळा येथील केंद्राद्वारे अभ्यासाच्या सोप्या पद्धतीची कार्यशाळा

हिंदवी’त विद्यार्थ्यांवर मनःशक्ती प्रयोग लोणावळा येथील केंद्राद्वारे अभ्यासाच्या सोप्या पद्धतीची कार्यशाळा

सातारा प्रतिनिधी- विद्यार्थ्यांना प्राचीन भारतीय परंपरेवर आधारित धडे देण्यासाठी हिंदवी पब्लिक स्कूलने मनःशक्ती केंद्रास पाचारण केले आहे. लोणावळा येथील मनःशक्ती प्रयोग केंद्र, रेस्ट न्यू वे या संस्था विद्यार्थ्यांना तणावमुक्त अभ्यास व परीक्षेतील ताण कमी करण्यासाठी मेंदूशास्त्र, मानसशास्त्र व अन्य शास्त्रांवर आधारित प्रयोग, अभ्यासाच्या सोप्या पद्धती, स्मरणशक्ती वाढवणे व तत्सम प्रशिक्षण देणार आहेत.

शाहूपुरी हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये मनःशक्ती केंद्र, लोणावळा यांच्यातर्फे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी माईंड जिम उपक्रम स्कूलमध्ये घेण्यात आला. या उपक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माइंड जिमचे समन्वयक दीपक आलोलकर, उमा चंदने, पद्माकर पाठकजी, मनःशक्ती केंद्राचे साधक अजिंक्य कुलकर्णी, अश्विनी कुलकर्णी व त्यांचे सहकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, हिंदवी पंचकोशाधारित गुरुकुलच्या कार्यकारी संचालिका रमणी कुलकर्णी, स्कूलच्या मुख्याध्यापिका मंजूषा बारटक्के, उपमुख्याध्यापिका शिल्पा पाटील यांनी माता जिजाऊ व शिवराय, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला, तसेच २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

श्री. आलोलकर यांनी माईंड जिम या उपक्रमाबाबत पालकांना अवगत केले. यावेळी पालकांसाठी ‘सुजाण पालकत्व’ या विषयावर नर्सरी ते दहावीच्या सर्व पालकांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान व विद्यार्थ्यांसाठी बौद्धिक क्षमतेवर आधारित विविध खेळ घेण्यात आले. या वेळी त्यांनी पालकांशी संवाद साधला. पालकांशी संवाद साधताना पालकांनी मुलांशी मित्रत्वाचे नाते निर्माण करावे. त्यांच्याशी सुसंवाद साधून आपली खंबीर साथ कायम त्यांच्या पाठीशी आहे, असा विश्वास त्यांच्यात पालकांनी निर्माण करावा याबाबत मार्गदर्शन केले, तसेच उमा चंदने यांनी पुढील कार्यक्रमाची सूत्रे हाती घेऊन पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या सहकाऱ्यांनीही सर्व विद्यार्थ्यांसाठी बौद्धिक खेळ आयोजित केले. या कार्यशाळेस विद्यार्थी, पालक आणि शिक्षक उपस्थित होते. श्रीमती बारटक्के यांनी प्रास्ताविक केले. वर्षा रांगोळे यांनी सूत्रसंचालन केले. श्रीमती पाटील यांनी आभार मानले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन

Post Views: 21 गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन महाबळेश्वर : गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक

Live Cricket