केळघर घाटात काळा खडक येथे दरड कोसळली; मेढा–महाबळेश्वर मार्गावरील वाहतुकीवर परिणाम, हटविण्याचे काम सुरू

केळघर : मेढा–महाबळेश्वर मुख्य मार्गावरील केळघर घाटातील काळा खडक परिसरात सोमवारी दरड कोसळल्याची घटना घडली. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असून वाहनचालकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि पोलीस विभागाला तातडीने कळविण्यात आले. संबंधित विभागांना जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेली दरड हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या असून युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे.
प्रशासनाकडून रस्ता लवकरात लवकर वाहतुकीसाठी सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, घाटातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी व पर्यटकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून खबरदारीने प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




