तंत्रज्ञानाची जोड नि रहिमतपूर पोलिसांची चिकाटी! CEIR पोर्टलच्या मदतीने ८ लाख ७५ हजार किमतीचे 32 गहाळ मोबाईल मिळवून नागरिकांना सुपूर्त
रहिमतपूर -मा. पोलीस अधीक्षक सो, श्री. निखिल पिंगळे, मा. अपर पोलीस अधीक्षक सो, श्रीमती वैशाली कडुकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री तेरणी सो, यांचे मार्गदर्शनाखाली रहिमतपुर पोलीस ठाणेचे प्रभारी सहा पोलीस निरीक्षक श्री. विनोद नेवसे सो, यांनी रहिमतपुर पोलीस ठाणे हद्दीतील नागरीकांचे मोबाईल गहाळ होण्याचे तक्रारीमध्ये वाढ झाल्याचे दिसून आल्याने नागरीकांचे गहाळ झालेले मोबाईलचा शोध घेणेकामी रहिमतपुर पोलीस ठाणेतील गुन्हे प्रकटीकरण पथकास सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने डीबी पथकातील पोलीस अंमलदार यांनी आपले कौशल्यासोबत तंत्रज्ञानाची जोड, रहिमतपुर पोलीसांची चिकाटी व CEIR पोर्टलचे मदतीने महाराष्ट्रातुन व पर राज्यातुन हस्ते परहस्ते मोबाईल धारकाशी वारंवार संपर्क करून नागरिकांचे गहाळ झालेले एकुण 8,75,000/- रूपये किंमतीचे महागडे 32 स्मार्ट मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश आले असुन सदरचे मोबाईल हे आजरोजी मुळ मालक यांना परत देण्यात आले. आपले हरविलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरीकांनी रहिमतपुर पोलीस व सातारा जिल्हा पोलीसांचे आभार मानले.
तसेच जास्तीत जास्त नागरीकांचे गहाळ झालेले मोबाईल हे त्यांना परत मिळवुन देणेकामी रहिमतपुर पोलीस कटीबध्द असुन सदरची गहाळ मोबाईल शोध मोहिमी ही अशाचे प्रकारे पुढे देखील यशस्वी पणे राबावण्यात येणार असल्याचे रहिमतपुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. विनोद नेवसे यांनी सांगीतले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक सो, श्री. निखिल पिंगळे, मा. अपर पोलीस अधीक्षक सो, श्रीमती वैशाली कडुकर, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी सो, राजश्री तेरणी, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. विनोद नेवसे, पोलीस उपनिरीक्षक श्री. गंगाप्रसाद केंद्रे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस हेड कॉन्टेबल श्री. प्रविण बर्गे, पोलीस कॉन्स्टेबल तुषार काळंगे, अमर चव्हाण, अमर भोसले यांनी केली आहे.





