अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » ठळक बातम्या » वाई वाठार रस्त्यावर वडाची बलाढ्य फांदी कोसळल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा

वाई वाठार रस्त्यावर वडाची बलाढ्य फांदी कोसळल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा

वाई वाठार रस्त्यावर वडाची बलाढ्य फांदी कोसळल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा

वाई प्रतिनिधी( शुभम कोदे)वाई वाठार रस्त्यावर पद्मावती मंदिरा जवळ वडाची बलाढ्य फांदी अचानक तुटुन रस्त्यावर कोसळल्याने सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही .पण काही तास वाहतुक थांबल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतुकीची कोंडी झाली .याची माहिती पिडल्बुडी विभागाचे उप अभियंता गोजारी यांना समजताच त्यांनी वाई वाठार रस्त्याचे शाखा अभियंता गोरे यांना तातडीने कटर ट्रॅक्टर जिसीबी सह कामगार घेऊन घटना स्थळावर जाण्याचे आदेश दिले होते.

हे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणी त्यांनी घटना स्थळाची पाहणी केली असता तुटुन पडलेल्या फांदीला भलेमोठे आगी महु असल्याने काहीकाळ भितीचे वातावरण निर्माण झाले होते.. पण कामगारांनी आपला जीव धोक्यात घालून शिताफीने असणारे आगी महु बाजूला काढुन पडलेल्या फांदीचे कटरच्या साह्याने तुकडे करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करुन तुंबलेली वाहतुक सुरळीत करण्यासाठी यश प्राप्त केले .वाहतुक जलद सुरळीत केल्या बद्दल वाहन चालकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार मानले.

गेल्या दोन महिन्यां पासून वाई सुरूर रस्त्याचे काम सुरू असल्याने तो रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला असल्याने त्या वरील वाई महाबळेश्वर कडे जाणारी सर्व वाहनांची वाहतुक जोशी विहीर ओझर्डे मार्गे वाईकडे जात असल्याने या रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी पहावयास मिळत आहे.याही रस्त्यावर ब्रिटिश काळातील मोठ मोठी वडांच्या झाडासह इतर झाडेही उभी आहेत .या उभ्या झाडांना भल्या मोठ्या फांद्या असल्याने या फांद्यांचा भार झाडांना पेलवत नसल्याने अशा फांद्या सध्या कोसळताना दिसत आ‌हेत . त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने इमरजंशीसाठी आपत्ती निवारण पथक सदैव तयार ठेवले आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता गोंजारी यांनी दिली आहे .

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket