Home » ठळक बातम्या » आम्ही दोघे समाजासाठी एकत्रच आहोत आणि थोरला भाऊ म्हणून मी शिवेंद्रराजेंची कायम पाठराखण करणार- खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

आम्ही दोघे समाजासाठी एकत्रच आहोत आणि थोरला भाऊ म्हणून मी शिवेंद्रराजेंची कायम पाठराखण करणार- खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

आम्ही दोघे समाजासाठी एकत्रच आहोत आणि थोरला भाऊ म्हणून मी शिवेंद्रराजेंची कायम पाठराखण करणार- खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

गेली २०- ३० वर्षांपासून शिवेंद्रराजे आणि मी तुमची सेवा करत आहोत. आमचा काय स्वार्थ आहे? काहीही नाही. आमच्या घराण्याच्या वारशानुसार फक्त आम्हाला समाजसेवा करायची आहे. शिवेंद्रराजे ४ टर्म आमदार आहेत. कोणीही येईल आणि उभा राहील. त्यांनी आजवर,काय काम केलं? याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. शिवेंद्रराजेंसारखा उमदा, होतकरू, कर्तृत्ववान आणि प्रेमळ आमदार तुम्हाला मिळाले आहेत. त्यांचे काम मोठे आहे. त्यांना मंत्रिपद मिळाले पाहिजे आणि त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करीन असा शब्द देऊन आमच्या श्वासात श्वास असे पर्यंत आम्ही दोघेही तुमची सेवा करत राहू, अशी ग्वाही खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांनी दिली. 

भुईंज (महेंद्रआबा जाधवराव )कोंडवे ता. सातारा येथे सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कोंडवे व लिंब जिल्हा परिषद गटांचा संयुक्तिक मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी खा. उदयनराजे बोलत होते. मेळाव्याला आ. शिवेंद्रराजे यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेंद्र लवंगारे, भाजपचे तालुकाध्यक्ष महेश गाडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब गोसावी, अनिता चोरगे, संगीत ननावरे, रेश्मा शिंदे, प्रतीक कदम, संदीप शिंदे, नाना शिंदे, पंचायत समितीच्या माजी सभापती सरिता इंदलकर, धर्मराज घोरपडे, जितेंद्र सावंत, लक्ष्मण कडव, सर्जेराव सावंत, बाळासाहेब चोरगे, सीमा जाधव, नामदेव सावंत यांच्यासहसर्व आजी- माजी पदाधिकारी, सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायट्यांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

             खा. उदयनराजे म्हणाले, महायुतीच्या माध्यमातून आपली विकासकामे मार्गी लागली. विविध कल्याणकारी योजना आल्या. शिवेंद्रराजेनी तर संपूर्ण मतदारसंघात विकासकामांचा झंजावात केला आहे. लोकशाही आहे त्यामुळे कुणीही निवडणुकीला उभे राहू शकते पण, आपण जनतेसाठी काय केलं आहे? काहीतरी केलं पाहिजे ना, तरच आपल्याला मते मागायचा अधिकार आहे. जाऊ द्या काहीच काम केलं नाही किमान जनसपंर्क तरी ठेवायचा होता, असा टोला खा. उदयनराजेंनी विरोधी उमेदवाराला लगावला. शिवेंद्रराजेंचा मी थोरला भाऊ आहे. वाद काय प्रत्येक घरात असतात. आम्ही दोघे समाजासाठी एकत्रच आहोत आणि थोरला भाऊ म्हणून मी शिवेंद्रराजेंची कायम पाठराखण करणार, असेही ते म्हणाले. 

             आ. शिवेंद्रराजे म्हणाले, कर्तव्यशून्य आणि इच्छाशक्ती नसलेल्या विरोधी उमेदवाराने आजवर तुमच्यासाठी काय केलं आहे? माणसं सोडा त्यांना साधी गावं सुद्धा माहित नाहीत. मतदारसंघात आम्ही केलेल्या गुळगुळीत रस्त्याने आता गावागावात फिरत आहेत आणि कुठे आहे विकास असा सवाल करत आहेत. आपण एवढे रस्त्यांचे जाळे विणले आहे की, एखाद्या गावात गेल्यावर दुसऱ्या गावत कुठला रस्ता जातो हेही त्यांना कळत नाही. विरोधक असे आहेत की, त्यांच्यावर बोलण्यासारखं काहीच नाही. मी केलेल्या विकासकामांची पोचपावती जनता मला विक्रमी मतांनी विजयी करून देणार आहे. जे उद्धव ठाकरे गटातील कट्टर, सच्चे शिवसैनिक आहेत त्यांनी त्या उमेदवाराकडून आत्ताच प्रतिज्ञापत्र लिहून घ्यावे. कारण, २३ तारखेच्या निकालानंतर हे पार्सल पुन्हा अजिदादांच्याच राष्ट्रवादीत परत जाणार आहे. माझा जनतेवर पूर्ण विश्वास असून सातारा- जावलीतील जनता मला विक्रमी मतांनी विजयी करेल, असा विश्वास आ. शिवेंद्रराजेनी व्यक्त केला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन

Post Views: 19 गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन महाबळेश्वर : गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक

Live Cricket