Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » किसन वीर’कडून वारकऱ्यांच्या सेवेसाठी पाण्याचा टँकर

किसन वीर’कडून वारकऱ्यांच्या सेवेसाठी पाण्याचा टँकर

किसन वीर’कडून वारकऱ्यांच्या सेवेसाठी पाण्याचा टँकर

भुईंज, दि.४/७/२०२४: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या उदात्त हेतुने किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष वाई-खंडाळा – महाबळेश्वर तालुक्याचे जननायक आमदार मकरंद (आबा) पाटील यांच्या नेतृत्वाखालील व्यवस्थापनाने वारकऱ्यांच्या सेवार्थ पिण्याच्या पाण्याच्या टँकरची सोय केलेली आहे. या पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे पुजन किसन वीर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करून तो वारकऱ्यांच्या सेवेसाठी मार्गस्थ करण्यात आला.

यावेळी प्रमोद शिंदे म्हणाले की, आळंदीहुन निघालेल्या या वारीमध्ये सर्व स्तरातुन वारकरी सहभागी होत असतात. पंढरीच्या वारीमध्ये फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सिम भक्तीचे दर्शन होत असते. हरीमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा प्रवास पायी करून पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असतात. या वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवु नये, याकरिता किसन वीर कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील कारखाना व्यवस्थापनाने वारकऱ्यांच्या सेवेकरिता मागील दोन वर्षांपासून कारखान्यामार्फत पाण्याचा टँकर देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता.

कार्यक्रमास कारखान्याचे संचालक प्रकाश धुरगुडे, संजय कांबळे, विलासराव बाबर, कार्यालयीन अधिक्षक उमेश अंबिके, वित्त अधिकारी मधुकर जाधव, केन मॅनेजर शंकरराव कदम, मुख्य शेती अधिकारी विठ्ठलराव कदम, ईडीपी मॅनेजर आर. जे. सणस, परचेस ऑफिसर संतोष जगताप, राजेंद्र जगताप, नितीन निकम, तोडणी वाहतुक संस्थेचे मॅनेजर बी. आर. सांवत यांच्यासह शेतकरी सभासद उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारचे साहित्य संमेलन दिशादर्शक ठरेल विनोद कुलकर्णी यांच्या सत्कारप्रसंगी डॉक्टर सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

Post Views: 29 सातारचे साहित्य संमेलन दिशादर्शक ठरेल विनोद कुलकर्णी यांच्या सत्कारप्रसंगी डॉक्टर सदानंद मोरे यांचे प्रतिपादन सातारा प्रतिनिधी-सातारा ही

Live Cricket