Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » वाईच्या धोम धरणातुन दोन हजार क्युसेस पाणी कृष्णा नदी पात्रात सोडणार असल्याने नागरिकांनी नदी पात्रात जावु नये – तहसीलदार सोनाली मेटकरी यांचे आवाहन

वाईच्या धोम धरणातुन दोन हजार क्युसेस पाणी कृष्णा नदी पात्रात सोडणार असल्याने नागरिकांनी नदी पात्रात जावु नये – तहसीलदार सोनाली मेटकरी यांचे आवाहन 

वाईच्या धोम धरणातुन दोन हजार क्युसेस पाणी कृष्णा नदी पात्रात सोडणार असल्याने नागरिकांनी नदी पात्रात जावु नये . तहसीलदार सोनाली मेटकरी यांचे आवाहन 

वाई (शुभम कोदे)वाईच्या पश्चिम भागात असणार्या धोम धरणातु आज शनिवार दि . २६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कृष्णा नदीच्या पात्रात दोन हजार क्युसेस इतके पाणी सोडण्यात येणार आहे .तरी नदी काठाच्या दुतर्फा असणार्या गावातील ग्रामस्थांनी खबरदारीचा उपाय म्हणून जनावरे धुण्यासाठी आणी महिलांनी कपडे धुण्यासाठी व स्नांन करण्या साठी नदी पात्रात जावु नये असे आवाहन वाईच्या तहसीलदार सोनाली मेटकरी . वाई नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी व प्रशासक संजीवनी दळवी . धोम बलकवडी धरणाचे कार्यकारी अभियंता योगेश शिंदे . वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे .धोम बलकवडी धरणाचे उप अभियंता सत्यजोत गोसावी . शाखा अभियंता स्वप्नील बोरसे . कालवा निरीक्षक केदार भाडळकर यांनी केले आहे .

धोम बलकवडी धरणा खालील कृष्णा नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येत आहे, की धोम बलकवडी धरण सद्यस्थिती मध्ये *84.39% टक्के भरलेले आहे. काल रात्री पासुन धरण परिसरात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस चालू असल्याने धरणा मध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे .

धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्या करीता सद्यस्थितीत नदीपात्रा मध्ये सांडव्या वरून सकाळी 8:00 वा.  1127 क्युसेक्स विसर्ग व विद्युत गृहातून 330 क्युसेक्स असे एकूण 1457 क्युसेक्स सोडण्यात आलेला आहे.तरी, त्या अनुषंगाने धोम बलकवडी धरणा खालील कृष्णा नदीपात्रा मध्ये पाण्याची आवाका नुसार टप्प्या टप्प्याने विसर्ग वाढविण्यात अथवा कमी करण्यात येऊ शकतो याची नोंद घ्यावी.

    तरी धोम बलकवडी आणी धोम धरणा खालील कृष्णा नदी काठच्या दुतर्फा गावातील सर्व नागरीकांना सूचित करण्यात येते की, कोणीही नदीपात्रात उतरू नये. नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास ती तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावीत .

 सखल भागातील संबंधित नागरिकांना गावचे गाव कामगार तलाठी ग्रामसेवक कोतवाल यांच्या कडुन सूचना देण्यात  याव्यात, सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत  जलसंपदा विभागास व प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन वरील प्रशासनाच्या जबाबदार अधिकार्यांनी केले आहे .

 

 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

न्यू एरा हायस्कूल, पाचगणी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘आर्ट मेला’चे आयोजन

न्यू एरा हायस्कूल, पाचगणी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘आर्ट मेला’चे आयोजन पाचगणी प्रतिनिधी-न्यू एरा हायस्कूल, पाचगणी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त इयत्ता पहिली

Live Cricket