Home » Uncategorized » क्राईम डायरी » विनापरवाना अग्निशस्त्र जवळ बाळगले म्हणून पोलीसांनी एकास केले अटक

विनापरवाना अग्निशस्त्र जवळ बाळगले म्हणून पोलीसांनी एकास केले अटक 

विनापरवाना अग्निशस्त्र जवळ बाळगले म्हणून पोलीसांनी एकास केले अटक 

शिरवळ -मा.नामदार श्री.नितीन गडकरी केंद्रीय मंत्री यांचा सातारा जिल्हयातील भुईज व शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत दौरा असल्याने त्यांचे दौरा कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत आगावु गोपनिय माहीती, अवैध अग्निशस्त्रांचा शोध व ईतर संबंधाने कारवाई करण्याबाबत मा. वरिष्ठ कार्यालयाकडून सुचना प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार पोलीस ठाणे ह‌द्दीत गोपनिय माहीती, अवैध अग्निशस्त्रांचा शोध व ईतर संबंधाने कारवाई करण्याबाबत गस्त व शोध मोहीम सुरू होती.

या पार्श्वभुमीवर सातारा जिल्हयातील शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ०८/०५/२०२६ रोजी पोलीसांना एका आरोपीने देशी बनावटीचे पिस्टल विनापरवाना स्वतः जवळ बाळगले असल्याची गोपनिय बातमी/माहीती मिळाली. या मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीस पथकाने त्याचा शोध घेवून त्यास ताब्यात घेतले व त्याची अंगझडती घेतली असता त्याचेजवळ देशी बनावटीचे पिस्टल मिळून आले.

त्यामुळे त्याचेवर अपराध क्रमांक १६८/२०२६, कलम ३(१), २५ भारतीय हत्यार अधिनियम / शस्त्र अधिनियम १९५९ सह कलम ३७ (१) (३), १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम -१९५१ अन्वये गुन्हा दाखल करून त्यामध्ये त्यास अटक केले आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव व पत्ता तेजस राजेंद्र मोटे, वय २० वर्षे, राहणार मुक्काम पोस्ट धनगरवाडी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा असा असून त्यास मा. न्यायालयाने दिनांक – १२/०५/२०२६ रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड सुनावले आहे. गुन्हयाचा पुढील तपास सुरू आहे.

सदरची कारवाई मा. श्री. निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक, सातारा, श्रीमती. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा, श्री. विशाल खांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण भाग, फलटण व यशवंत नलवडे, पोलीस निरीक्षक, शिरवळ पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शानाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव शिद, पोलीस उप निरिक्षक शंकर पांगारे आणि सतिश आंदेलवार, सहाय्यक पोलीस उप निरिक्षक विलास यादव, पोलीस हवालदार ०९/सचिन विर, पोलीस शिपाई १७८७/सुरज चव्हाण, पोलीस शिपाई ३३७/बोराटे, पोलीस शिपाई / ८२२ मोझर, पोलीस शिपाई २६०९/अरविंद बाहऱ्हाळे, पोलीस शिपाई ११७२/भाऊसाहेब दिघे व पोलीस शिपाई ३२५/अक्षय नेवसे यांनी केलेली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नीट चा पेपर पुन्हा होणार

नीट चा पेपर पुन्हा होणार पेपर लीक झाल्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG रद्द करण्यात आली आहे. ३ मे रोजी

Live Cricket