लोकमत वन वर्ल्ड समिटमध्ये यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चा सन्मान सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्च शिक्षण आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आधुनिकतेकडे वाटचाल  मतदार यादीतून नाव वगळले असल्यास ३० सप्टेंबरपर्यंत पुन्हा नाव नोंदणीची संधी, ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार याद्या अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » विद्यार्थिप्रिय शिक्षक हे समाजाचे भूषण-आमदार मनोजदादा घोरपडे; मोहन जाधव यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

विद्यार्थिप्रिय शिक्षक हे समाजाचे भूषण-आमदार मनोजदादा घोरपडे; मोहन जाधव यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

विद्यार्थिप्रिय शिक्षक हे समाजाचे भूषण-आमदार मनोजदादा घोरपडे; मोहन जाधव यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

नागठाणे, ता. 15 : विद्यार्थिप्रिय शिक्षक हे समाजाचे भूषण असतात. असे शिक्षक समाजाच्या मनात कायमच आदराचे स्थान निर्माण करतात, असे मत आमदार कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी व्यक्त केले.

नागठाणे नंबर दोन (ता. सातारा) येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक मोहन जाधव यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात ते बोलत होते.

कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे संचालक ॲड. धनाजी जाधव, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन राजेंद्र घोरपडे, शिक्षक नेते मोहनराव जाधव, विस्तार अधिकारी शशिकला जगताप, केंद्रप्रमुख नारायण बागल, अनिल चव्हाण, विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन सुरेश पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती.

कर्तव्य भावना, सचोटी, सेवाभावी वृत्ती, वक्तशीरपणा हे गुण शिक्षकाला वेगळी ओळख प्राप्त करून देतात. या बळावर मोहन जाधव यांनी केलेले शैक्षणिक कार्य प्रेरणादायी असल्याचे मत आमदार घोरपडे यांनी व्यक्त केले.

भिकाजी निकम, उद्धव निकम, मुकुंद पोळ, हणमंत मोरे, गजानन जाधव, बबनराव जाधव, प्रतीक जाधव, जयवंत जाधव, गोरख जाधव, राजेंद्र जाधव, शंकर जाधव, संजय जाधव, डॉ. संतोष शिंदे, भानुदास जाधव,प्रदीप जाधव, हेमंत जाधव तसेच माजगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते. विजय देशमुख यांनी प्रास्ताविक केले. धैर्यशील जाधव यांनी स्वागत केले. बाळासाहेब चव्हाण यांनी आभार मानले. अलका साबळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमात मोहन जाधव यांचा आमदार मनोजदादा यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket