मुलींनी आत्मसंरक्षणासाठी कायमच सज्ज राहिले पाहिजे : विद्याधर गायकवाड
कराड प्रतिनिधी- महिला आणि विशेषतः लहान मुलींवरती अत्याचार वाढत असून याबाबत नागरिक, पालक आणि विद्यार्थिनींनी आत्म संरक्षणासाठी आपल्या मनाची शरीराची तयारी केली पाहिजे. विशेषत: मुलींनी आत्मसंरक्षणासाठी कायमच सज्ज राहिले पाहिजे असे प्रतिपादन यशदाचे प्रवीण प्रशिक्षक आणि मी नागरिक फाउंडेशनच्या अध्यक्ष विद्याधर गायकवाड यांनी केले.
निळेश्वर वडोली ता कराड येथील ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या निळेश्वर माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन आणि कराड तालुका पोलीस ठाणे निर्भया पथक दक्ष नागरिक पोलीस मित्र आणि मी नागरिक फाउंडेशन कराड यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षित बालक संवाद यात्रा या प्रकल्प अंतर्गत “विद्यार्थ्यांनीची सुरक्षित:” या विषयावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात गायकवाड बोलत होते. यावेळी कराड तालुका पोलीस ठाणे निर्भय पथकाच्या प्रमुख सौ.हसीना मुजावर, विद्यालयाचे मुख्याध्यापक सचिन नलावडे,यशदा’चे प्रवीण प्रशिक्षक संजय साठे, सखी सावित्री समितीचे सदस्य शरद पवार आदी मान्यवर पदाधिकारी यांचे प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी कराड तालुका पोलीस ठाण्याच्या निर्भया पथकाच्या प्रमुख सौ. हसीना मुजावर यांनी विद्यार्थ्यांना “गुड टच बॅड टच” या विषयावर मार्गदर्शन करून त्यांनी बिकट प्रसंगात कसे वागावे याचे स्पष्टीकरण प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या भूमिका मध्ये काम करून शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सखी सावित्री समितीची पहिली बैठकही पार पडली. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सचिन नलवडे यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि सरस्वती यांच्या प्रतिमांचे पूजन केले. यावेळी इयत्ता दहावीतील एक दिवसीय मुख्याध्यापिका कुमारी अंजली पवार हिनेही प्रतिमांचे पूजन केले. इयत्ता सहावीतील विद्यार्थिनींनी स्वागत गीताने प्रमुख अतिथींचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पवार मॅडम यांनी केले.मुख्याध्यापक नलवडे यांनी प्रमुख अतिथींची ओळख करून दिली. इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी गार्गी हिने शिक्षकांप्रती आपले विचार व्यक्त केले, तर अंजली पवार हिने शिक्षक म्हणून काम करताना आलेले अनुभव शेअर केले.कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या यशदाचे प्रवीण प्रशिक्षक मा. विद्याधर गायकवाड यांनी मुलींना आत्मसंरक्षणाविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी महिलांवर होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या शोषणांविषयी चर्चा करत मुलींनी निर्जन स्थळी दक्षता कशी घ्यावी, पालक, पोलीस आणि शिक्षकांची मदत कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी “सुरक्षित बालक संवाद यात्रा” या उपक्रमाची माहिती देत, मुलींच्या सुरक्षेसाठी विविध उपक्रम राबवण्याचे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सत्कार केला आणि श्री. जाधव एस.पी. यांनी आभार प्रदर्शन केले.