‘वंदे मातरम्’ गीताच्या सार्ध शताब्दी महोत्सवाचे बोधचिन्ह अनावरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालय येथे ‘वंदे मातरम्’ गीताच्या सार्ध शताब्दी महोत्सवाचे बोधचिन्ह अनावरण करण्यात आले. देशभक्ती आणि राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक असलेल्या या गीताला 7 नोव्हेंबर 2025 रोजी 150 वर्ष पूर्ण होत आहेत.
प्रत्येक तालुक्यात ‘वंदे मातरम्’चे समूहगान तसेच कौशल्य विद्यापीठ, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि ग्रामीण भागात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. मुंबईतील जे. जे. कला महाविद्यालयातील तज्ज्ञ परीक्षकांनी ऑनलाईन बोधचिन्ह डिझाईन स्पर्धेत 350 स्पर्धकांपैकी पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयाचे प्रा. रवी पवार यांनी डिझाईन केलेल्या बोधचिन्हाची निवड केली. राज्यस्तरीय समितीच्या माध्यमातून या उत्सवाचे आयोजन होणार आहे.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आकाश फुंडकर, मंत्री अतुल सावे, मंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते.
