Home » ठळक बातम्या » उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वाई ची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वाई ची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वाई ची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

वाई प्रतिनिधी -उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वाई ची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक २८ सप्टेंबर २०२४ रोजी सभासदांच्या उपस्थितीत संपन्न झाली. सभेची सुरवात संस्थेचे सभासद ज्यांचे अहवाल सालात आकस्मित निधन झाले अश्या सर्वाना श्रद्धांजली अर्पण करून व संस्थेचे संस्थापक स्व आनंद कोल्हापुरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून झाली.

अध्यक्षीय मनोगतात श्रीमती अनुराधा कोल्हापुरे यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीची घौडदौड व वर्षभरातील उल्लेखनीय कामगिरीचा आढावा सांगितला. या वर्षात मिळालेल्या यशाचे श्रेय सर्व सभासद, कर्मचाऱ्यांच्या समर्पणाला दिले. माहे मार्च २०२४ अखेर संस्थेचा एकत्रित व्यवसाय २०२ कोटी असून आज अखेर त्यात तब्बल ६ कोटींची वाढ होवून २०८ कोटीपेक्षा अधिक व्यवसाय वाढ झाली असल्याचे सांगितले. संस्थेच्या आता एकूण १० शाखा झाल्या असून सर्व शाखा कायम नफ्यात व सर्व सभासदांच्या १०० % ठेवी सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व कर्मचारी व संचालक मंडळ नेहमीच प्रयत्नशील राहतील अशी ग्वाही अध्यक्षांनी दिली. 

संस्थेचे संचालक श्री अमर कोल्हापुरे यांनी संस्थेने घेतलेल्या विविध उपक्रमांवर प्रकाश टाकला, ज्यामध्ये डिजिटल सेवांचा विस्तार, सभासदांसाठी नव्या कर्ज योजना, आणि बचत योजनेतील वाढ यांचा समावेश होता. सभासदाच्या वाढदिवसानिमित्त त्या सभासदाला भेट रुपी प्रचलित व्याजदरापेक्षा ०.५० % ज्यादा व्याज देणार असल्याची ठेव योजना देखील त्यांनी जाहीर केली. यावर्षी संस्थेचे उद्दिष्ट सर्व स्तरातील लोकांपर्यंत आपल्या सेवा पोहोचवणे, तसेच सभासदांची संख्या वाढवणे हे आहे. याशिवाय, संस्थेने सामाजिक उपक्रमांमध्ये अधिकाधिक सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

सभासदांनी दिलेल्या अभिप्रायांनुसार काही सुधारणा करण्याचे ठरले. संस्थेची नाहक बदनामी करणारे सभासद त्यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत व सभासदत्व त्वरित रद्द करणेचा ठराव करणेची सूचना सभासदांनी दिली. सर्व सभासदांनी संस्थेच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आणि पुढील वर्षीही अधिक यश मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना घरपोच चादर वाटप केली त्याप्रती देखील सभासदांनी विशेष कौतुक केले. लाभांश जाहीर झाला त्याच क्षणी सभासदाच्या खात्यावर तो वर्ग देखील झाला, यासाठी सर्व सभासदांनी आनंद व्यक्त केला. कर्ज थकीत ठेवणाऱ्या थाबाकीदारांवर संस्थेने कठोर कारवाई करावी असे मत सभासदांनी व्यक्त केले. संस्थेचे सभासद श्री शिवाजी निंबाळकर , श्री बाळासाहेब कोठावळे , श्री अविनाश जोशी , श्री राजाभाऊ खरात , श्री बाळकृष्ण वाघ , श्री जयवंत आबा पवार , श्री अतुल भाटे , श्री केदार राजपूत, डॉ चंद्रकांत शिंदे , श्री अशोक मांढरे , श्री राजेंद्र इथापे, श्री श्रीपाद कुलकर्णी, श्री महादेव पाटील, श्री रामचंद्र कानडे, श्री अनिल पटवर्धन व ज्येष्ठ विचारवंत श्री सतीश कुलकर्णी इ. यांनी चर्चेत सहभाग घेतला. 

तसेच सभेत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या कर्जदारांपैकी प्रातिनिधिक स्वरुपात आदर्श कर्जदार सौ अपर्णा सचिन मांढरे , श्री नामदेव ग्यानबा चोपडे , श्री मंगेश हनमंत शिंगटे , युवराज भीमराव झळके , आदर्श जमीनदार श्री नितीराज विलासराव बाबर व ज्येष्ठ सभासद श्री सुरेश बबन जाधव यांचा सन्मान करण्यात आला. 

सभेच्या विषय पत्रिकांचे वाचन संस्थेचे मुख्य व्यवस्थापक श्री प्रकाश पवार , अधिकारी सौ शिवानी पावशे , श्री ओमकार वनारसे व संचालक मंडळ यांनी केले. संचालक श्री भूषण तारू यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष ॲड श्री रमेश यादव, संचालक श्री अमर कोल्हापुरे , श्री मदन साळवेकर , डॉ मंगला अहिवळे , श्री श्रीकांत शिंदे , श्री शरद चव्हाण , श्री सालीमभाई बागवान , श्री संजय वाईकर , श्री सागर मुळे , श्री वैभव फुले , श्री भूषण तारू , श्रीमती नीला कुलकर्णी , श्रीमती अलका घाडगे व संस्थेचे सर्व कर्मचारी वृंद, दैनंदिन ठेव प्रतिनिधी उपस्थित होते.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उत्कर्षाच्या शिखरावर कार्यक्रमात प्रा नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न. 

उत्कर्षाच्या शिखरावर कार्यक्रमात प्रा नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न.  उत्कर्ष पतसंस्था आयोजित “उत्कर्षाच्या

Live Cricket