उरमोडी धरणातून आज सायंकाळी ६ वाजता १००० क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

सद्यस्थिती उरमोडी धरणामध्ये 8.50 टीएमसी ( 85% ) पाणीसाठा झाला असून, धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चालू असलेल्या पावसामुळे धरणामध्ये येणारा येवा वाढत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी आज दिनांक 27 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 6:00 वा. उरमोडी धरणाचे सांडव्यामधून 1000 क्युसेक ने विसर्ग करणेत येणार आहे.
तसेच सोडण्यात येणार्या विसर्ग मध्ये पावसाच्या प्रमाणानुसार व येणार्या येवा नुसार बदल होऊ शकतो.धरणाच्या सांडव्यावरून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे उरमोडी नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे. तरी नदी तीरावरील गावातील नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये. नदी काठावरील ग्राम प्रशासन व संबंधित यंत्रणा यांनी नोंद घ्यावी.
एकूण विसर्ग
सांडवा- 1000 क्युसेक
विद्युतगृह- 00 क्युसेक
एकूण उरमोडी नदीपात्रात येणारा विसर्ग :- 1000 क्युसेक
कार्यकारी अभियंता
कृष्णा सिंचन विभाग, सातारा




