कृष्णा व उपनद्यांवरील उपसा बंदी शिथिल
सातारा – सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदी व तिच्या कुडाळी, वेण्णा, उरमोडी, तारळी, वांग, उत्तरमांड आणि कोयना या उपनद्यांवरील सिंचनासाठीच्या उपसा योजनांवर लागू करण्यात आलेली बंदी शिथिल करण्यात आली आहे.
वरिष्ठ स्तरावरील निर्देशांनुसार संबंधित विभागीय व उपविभागीय कार्यालयांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबतची माहिती अधीक्षक अभियंता, सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ यांनी दिली.




