मेढा प्रतिनिधी:सातारा जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी सातारा या संस्थेच्या चेअरमनपदी तहसिल कार्यालय जावळी मेढा येथे सहाय्यक महसुल अधिकारी पदावर कार्यरत असणारे संजय बैलकर यांची बिनविरोध निवड करणेत आली आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अध्यासी अधिकारी प्रशांत आडे यांचे हस्ते नुतन चेअरमन यांचा शाल व बुके देवून सत्कार करणेत आला.

या संस्थेची स्थापना १६ ऑगस्ट, १९२९ रोजी झाली असुन संस्थेस ९६ वर्ष पूर्ण झाली आहेत. संस्थेचे भाग भांडवल रु.३५ कोटींचे असुन वार्षिक उलाढाल रु.४४ कोटींची आहे. संस्थेस लेखापरिक्षण अ वर्ग प्राप्त असून मागील वर्षी रु.१ कोटी ६८ लाख नफा झालेला आहे.
नुतन चेअरमन श्री. संजय बैलकर यांनी पदभार स्विकारताना सर्वांचे सहकार्य व मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली.संस्थेच्या प्रगतीसाठी सर्व संचालकांना सोबत घेऊन संस्थेचे कामकाज हे सहकार कायदयान्वये सभासद व संस्थेचे हीत जोपासून केले जाईल. संस्थेच्या उत्पन्नामध्ये भरीव वाढ करुन सभासदांना जास्तीत जास्त लाभांश देणेसाठी संचालक मंडळ प्रयत्नशील राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच सभासदांच्या आर्थिक गरजा भागविणेसाठी कमीत कमी व्याज दरात जास्तीत जास्त कर्ज पुरवठा करणेसाठीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणुन आजपासुन संस्थेच्या मध्यम मुदत कर्जाची मर्यादा रु.१ लाख करणेत आली अशी घोषणा चेअरमन संजय बैलकर यांनी केली.
यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन सुनिल सावंत, जेष्ठ संचालक जयंत वीर, चंद्रकांत कांबिरे, संचालक सागर कारंडे, विक्रमसिंह मोहिते, विनायक पाटील, दिलीप जानकर, सुनिता रेडेकर, संगिता कणसे, संदिप गार्डे, विक्रम शिंदे, नितीन क्षीरसागर, नितीन मोहिते, सुरेश जाधव व अशोक गोळे आदि संचालक उपस्थित होते. संस्थेचे व्यवस्थापक विनोद चव्हाण यांनी कर्मचा-यांच्या वतीने नुतन पदाधिका-यांचा सत्कार केला. सभा अत्यंत आनंददायी व उत्साही वातावरणात पार पडली.




