Home » राज्य » शिक्षण » वर्दीवर हल्ला! साताऱ्यात पोलिसावर वार

वर्दीवर हल्ला! साताऱ्यात पोलिसावर वार 

वर्दीवर हल्ला! साताऱ्यात पोलिसावर वार 

सातारा :राज्यातील पोलीस सुरक्षित आहेत का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.शांत, संयमी शहर म्हणून ओळख असणाऱ्या सातारा शहरात रात्रीच्यावेळी आरडाओरड करत तणाव निर्माण गोंधळ करणाऱ्या तरुणांचे प्रमाण वाढले आहे. सातारा शहर बसस्थानक बाहेर आरडाओरड करत गोंधळ घालत असलेल्या तरूणांना हटकल्याने एका तरूणाने सातारा शहर पोलीस ठाण्यातील एका हवालदाराच्या काखेत कोयत्याने वार केल्याची घटना शनिवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात हवालदार जखमी झाले असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तर त्यांना नऊ टाके घालण्यात आले आहेत.

 दुचाकीवरून चाैघेजण त्या ठिकाणी आले. दत्ता पवार यांना काही कळायच्या आत गाडीच्या अगदी शेवटी बसलेल्या तरूणाने त्यांच्यावर कोयत्याने वार केला. यानंतर संबंधित तरूण पळून गेले. रक्तबंबाळ अवस्थेतही दत्ता पवार यांनी त्यांचा पाठलाग केला. परंतु संबंधित तरूण सापडले नाहीत.

या प्रकाराची माहिती समजल्यानंतर पोलिस अधीक्षक समीर शेख, स्थानिक गुन्हे शाखेची टीम तसेच सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने त्या ठिकाणी धाव घेतली. यानंतर जखमी झालेल्या हवालदार पवार यांना तत्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. तसेच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, नऊ टाके घालण्यात आले आहेत. हल्ला करणाऱ्या युवकांना अटक करण्यात आले असून अधिक तपास चालू आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते यांचा अर्ज छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांच्या उपस्थितीत दाखल

Post Views: 472 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते यांचा अर्ज छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांच्या उपस्थितीत दाखल सातारा (अली मुजावर )साताऱ्यात आज

Live Cricket