अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली आर्वी येथे ‘जनता दरबार’ संपन्न 250 हून अधिक तक्रारी प्राप्त; बहुतांश तक्रारींचा जागेवरच निपटारा

आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली आर्वी येथे ‘जनता दरबार’ संपन्न 250 हून अधिक तक्रारी प्राप्त; बहुतांश तक्रारींचा जागेवरच निपटारा

आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली आर्वी येथे ‘जनता दरबार’ संपन्न 250 हून अधिक तक्रारी प्राप्त; बहुतांश तक्रारींचा जागेवरच निपटारा

 34 लाभार्थ्यांना शिधापत्रिका, अंत्योदय योजनेतून 14 महिलांना साडी वाटप

आर्वी, ता. कराड: सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली आर्वी येथे भव्य जनता दरबार’ आयोजित करण्यात आला. या दरबारात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती

यावेळी प्रांताधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार संगमेश कोंडे, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण मॅडम भूमी अभिलेख अधिकारी संजय कदम यांच्यासह महसूल, पुरवठा, एमएसईबी, जलसंपदा, आरोग्य, वन, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामविकास, पाणीपुरवठा, कृषी, शिक्षण इत्यादी विभागांचे सर्व खातेप्रमुख, शासकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांची उपस्थिती  

याप्रसंगी ज्येष्ठ नेते शंकर पाटील तात्यासाहेब साबळे, श्वेताताई गायकवाड, सोमनाथ निकम फौजी भगवान कदम, कृष्णत शेडगे मामा, अमोल कदम श्रीकांत माळी, सिताराम गायकवाड आप्पा कल्याण जाधव उद्धव जाधव, सचिन इंगळे, वीरेंद्र डोंबे सतीश जाधव, चंद्रकांत गायकवाड, विघ्नेश पवार आदी मान्यवर व सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

250 हून अधिक तक्रारींचे निवारण 

जनता दरबारात महसूल, पुरवठा, एमएसईबी, जलसंपदा, आरोग्य, वनविभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती, पाणीपुरवठा, कृषी, शिक्षण अशा विविध विभागांच्या 250 हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी बहुतांश तक्रारींचा जागेवरच निपटारा करण्यात आला. उर्वरित तक्रारी प्रशासकीय नोंदी तपासून तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिले.

लाभार्थ्यांना लाभ वाटप

यावेळी 34 नवीन लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. तसेच अंत्योदय योजनेतून 14 लाभार्थी महिलांना साडी वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

आमदार घोरपडे म्हणाले, “जनतेच्या समस्या थेट ऐकून त्या सोडविणे हाच जनता दरबाराचा उद्देश आहे. प्रशासनाने नागरिकांप्रती संवेदनशील राहून काम करावे. पुढील काळातही अशा दरबारांचे आयोजन केले जाईल.”

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket