महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन तडीपार इसमाच्या मुसक्या आवळल्या; 3 गावठी पिस्टलसह 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त लोकमत वन वर्ल्ड समिटमध्ये यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चा सन्मान सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Home » राज्य » शिक्षण » उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या तरुणांवर काळाचा घाला; तिघांचा जागीच मृत्यू, 4 गंभीर जखमी!

उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या तरुणांवर काळाचा घाला; तिघांचा जागीच मृत्यू, 4 गंभीर जखमी!

उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या तरुणांवर काळाचा घाला; तिघांचा जागीच मृत्यू, 4 गंभीर जखमी!

उज्जैन येथे देवदर्शनासाठी निघालेल्या तरुण भाविकांच्या कारचा चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात भीषण अपघात होऊन तीन जणांचा मृत्यू झाला; तर चार जण गंभीर जखमी झाले. कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या दगडांना जोरदार धडक दिली. बुधवारी (दि. ७) मध्यरात्री हा अपघात झाला.

मृत तरुणांमध्ये तुकाराम रामभाऊ अंभोरे (वय २७), शेखर रमेश दुरपते (वय ३१), घनश्याम रामहरी पिसोटे (वय ३०, सर्व रा. शेवगाव, जि. अहिल्यानगर) यांचा समावेश आहे.उज्जैन येथे दर्शनासाठी सात मित्रांचा ग्रुप जात होता. या तरुणांच्या कारचालकाचे कन्नड घाटातील वळणावर नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथील तिघांचा मृत्यू झाला, तर इतर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता, की कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला.

या भीषण अपघातात कारमधील योगेश तुकाराम सोनवणे (वय २८), अक्षय शिवाजी गिरे (वय २५), ज्ञानेश्वर कांता मोडे (वय २४, रा.), तुषार रमेश घुगे (वय २६, सर्व रा. शेवगाव) हे चौघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सध्या जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तरुणांचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. हा अपघात नेमका कसा झाला या संदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न

महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न ​महाबळेश्वर:येथील नामांकित

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket