तृप्ती जाधव ची ‘ऑक्सफर्ड ‘ ब्रोकीस युनिव्हर्सिटीत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी निवड
गोडोली -प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेचे वर्ये येथील कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्चची बीबीए या व्यावसायिक पदवीच्या अंतिम वर्षाची विद्यार्थ्यांनी तृप्ती सतीश जाधव हिची ऑक्सफर्ड ब्रोकीस युनिव्हर्सिटी लंडन येथे मास्टर ऑफ सायन्स इन इंटरनॅशनल बिझनेस या पदवीत्तर पदवी अभ्यासक्रम करण्यासाठी नुकतीच निवड झाली आहे. तिच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख, इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. बापूसाहेब सावंत, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.





