Home » ठळक बातम्या » नागरिकांना माफक दरातील दिवाळी फराळ मिळावा यासाठी व्यापारी सहकारी पतसंस्थेच्यावतीने व्यापारी लाडू चिवडा महोत्सव

नागरिकांना माफक दरातील दिवाळी फराळ मिळावा यासाठी व्यापारी सहकारी पतसंस्थेच्यावतीने व्यापारी लाडू चिवडा महोत्सव 

नागरिकांना माफक दरातील दिवाळी फराळ मिळावा यासाठी व्यापारी सहकारी पतसंस्थेच्यावतीने व्यापारी लाडू चिवडा महोत्सव 

लाडू, चिवडा महोत्सवाचे साताऱ्यात शनिवारपासून आयोजन

सातारा, दि. २३ (प्रतिनिधी) नागरिकांना माफक दरातील दिवाळी फराळ मिळावा यासाठी व्यापारी सहकारी पतसंस्थेच्यावतीने व्यापारी लाडू चिवडा महोत्सव आयोजित केला आहे. सदर उपक्रम अध्यक्ष कै. गुरुप्रसाद सारडा यांच्या संकल्पनेतून २० व्या वर्षीही सुरु ठेवण्यात आला आहे.

या महोत्सवाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन दिलीप पिलके यांचे हस्ते होणार आहे. पतसंस्थेच्यावतीने गेली १९ वर्षे हा महोत्सव आयोजित केला जातो. त्यास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. लाडू व चिवडा

 तयार करण्यासाठी बेसन, तेल, साखर, शेंगदाणे, पोहे, चुरमुरे दर्जेदार वापरले जातात. याबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही. हा लाडू चिवडा महोत्सव ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर नागरिकांना देण्यात येणार आहे असे श्री. पिलके यांनी सांगितले. यावर्षी मजुरी, इंधन, लागणारा कच्चा माल यामध्ये अधिक वाढ झाली आहे, असे असताना सुद्धा चिवडा केवळ १८० रुपये व लाडू १८० रुपये या दराने उपलब्ध करून देण्यात येत आहे. यंदाचा लाडू चिवडा महोत्सव शनिवार २६ आक्टोबर ते ३ नोव्हेंबर या नऊ दिवसाचे कालावधीमध्ये सुरु ठेवण्यात येणार आहे.

प्रभाकर राऊत मिठाईवाले मल्हारपेठ, सातारा येथे आयोजित केला असून, लाडू, चिवडा भरतशेट राऊत (राऊत मिठाईवाले) यांच्याकडे विक्रीची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. सातारकर नागरिकांनीं प्रतिसाद देऊन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन चेअरमन दिलीप पिलके यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सह्याद्रि कारखान्यासाठी तिरंगी लढत; 21 जागांसाठी 70 उमेदवार निवडणूक रिंगणात

Post Views: 33 सह्याद्रि कारखान्यासाठी तिरंगी लढत; 21 जागांसाठी 70 उमेदवार निवडणूक रिंगणात सह्याद्रि सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी

Live Cricket