Home » राज्य » शेत शिवार » पर्यटकांना साद घालणारा सडावाघापूरचा उलटा धबधबा

पर्यटकांना साद घालणारा सडावाघापूरचा उलटा धबधबा

पर्यटकांना साद घालणारा सडावाघापूरचा उलटा धबधबा

सातारा -तारळे पाटण रोडवर सुमारे 14 किमीवर असणाऱ्या सडावाघापूरला उलटा धबधबा आहे. दरवर्षी जुलै ऑगस्टमध्ये सडावाघापूर पठारावर असलेला हा धबधबा वाहू लागतो. परंतु यंदा जून महिन्यातच धबधबा वाहू लागला आहे.पठारावर संततधार पाऊस व जोरदार वारे असतात. यामुळे अनेक ठिकाणी पठारावरुन खाली वाहणारे पाणी वाऱ्यांच्या वेगामुळे उलट वाहते. त्यामुळे या ठिकाणी उलटा धबधब्याची परिस्थिती तयार होते. वाऱ्याचा दाब असल्यास अतिशय मनमोहक व डोळयाचे पारणे फेडणारा दृश्य या ठिकाणी दिसते.

यावर्षी मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला असल्याने सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. सडावाघापूर येथील उलटा धबधबा पर्यटकांना खुणावू लागला आहे. सातारा जिल्हयातील पर्यटकांबरोबरच कोल्हापूर, पुणे, मुंबईवरुनही पर्यटक निसर्गाचा अविष्कार पाहून मंत्रमुग्ध होत आहेत

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर हॉटेल चोरीप्रकरणी आरोपी मुंबई विमानतळावर जेरबंद; ९.९० लाखांचा मुद्देमाल जप्त

Post Views: 248 महाबळेश्वर हॉटेल चोरीप्रकरणी आरोपी मुंबई विमानतळावर जेरबंद; ९.९० लाखांचा मुद्देमाल जप्त महाबळेश्वर: महाबळेश्वर येथील हॉटेल ऑक्सिजनमध्ये २५

Live Cricket