Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » पर्यटकांचा बचाव करताना जीव गमावलेल्या काश्मिरी तरुणाच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मोठी मदत

पर्यटकांचा बचाव करताना जीव गमावलेल्या काश्मिरी तरुणाच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मोठी मदत

पर्यटकांसाठी जीवाची बाजी लावलेल्या आदिल शाहच्या कुटुंबाला मदत, एकनाथ शिंदे घर बांधून देणार

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला  होत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पर्यटकांच्या रक्षणासाठी धावून जाणारा सय्यद आदिल हुसैन शाह या अवघ्या 20 वर्षांच्या स्थानिक युवकाचा देखील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. माणुसकी दाखवत धाडसाने दहशतवाद्यांना सामोरे जाणाऱ्या सय्यदच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिकरित्या सय्यदच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत केली. 

पहलगाम येथे मदतीसाठी गेलेले शिवसेना कार्यकर्ते आणि सरहद संस्थेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून आज सय्यदच्या कुटुंबीयांना धनादेश देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सय्यदच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. 

अवघ्या 20 वर्षाचा असलेला सय्यद आदिल पहलगाममध्ये पर्यटकांना घोड्यावरुन फिरवण्याचं काम करायचा. त्याच्या घोड्यावरुन जो प्रवासी पहलागमची सफर करत होता त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. दहशतवादी समोर आल्यानंतर सय्यद याने धाडस दाखवत एका दहशतवाद्याची रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांनी त्याला गोळी मारल्याने त्याचा मृत्यू झाला. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket