अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » टॉपर्स टॉक’ – टॉप रँकर्सकडून मिळवा यशाची गुरुकिल्ली दिशा ॲकॅडमीचा प्रेरणादायी उपक्रम १४ एप्रिलला शाहू कलामंदिर सातारा येथे

टॉपर्स टॉक’ – टॉप रँकर्सकडून मिळवा यशाची गुरुकिल्ली दिशा ॲकॅडमीचा प्रेरणादायी उपक्रम १४ एप्रिलला शाहू कलामंदिर सातारा येथे

टॉपर्स टॉक’ – टॉप रँकर्सकडून मिळवा यशाची गुरुकिल्ली दिशा ॲकॅडमीचा प्रेरणादायी उपक्रम १४ एप्रिलला शाहू कलामंदिर  सातारा येथे

डॉक्टर, इंजिनिअर किंवा शास्त्रज्ञ होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिशा ॲकॅडमीने एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. देशपातळीवर यश मिळवलेल्या टॉप रँकर्स विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी यशोगाथा आणि त्यांच्या अभ्यासप्रवासातील महत्त्वाचे टप्पे विद्यार्थ्यांना उलगडून दाखवणारा ‘टॉपर्स टॉक’ हा विशेष कार्यक्रम १४ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत शाहू कलामंदिर, सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात IIT, AIIMS, IISER अशा नामांकित संस्थांमध्ये प्रवेश मिळवलेल्या आणि देशात टॉप रँक मिळवलेल्या विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधता येणार आहे. त्यांनी यशासाठी घेतलेले प्रयत्न, अभ्यासपद्धती, मनोबल वाढविणारी प्रेरणा आणि वेळेचे व्यवस्थापन याबद्दल थेट मार्गदर्शन मिळणार आहे. प्रत्यक्ष अनुभवातून यशापर्यंतच्या या प्रवासाला समजून घेण्याची संधी, भविष्याचा वेध घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार असल्याने अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन दिशा ॲकॅडमीच्यावतीने करण्यात आले आहे. 

विविध प्रेरणादायी सत्र आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांचे प्रणेते प्रा. डॉ. नितीन कदम (संस्थापक आणि अध्यक्ष – दिशा अकॅडमी) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून, भविष्यातील डॉक्टर, इंजिनिअर आणि शास्त्रज्ञ घडवण्यासाठी दिशा देण्यासाठी शिक्षणतज्ञ नितीन कदम, विद्यार्थी आणि पालकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी उपलब्ध असतील. 

विद्यार्थ्यांसोबतच पालकांनीही या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी ८९५६४०७८७१ / ७२ या क्रमांकावर संपर्क साधून नावनोंदणी करावी असे देखील आवाहन दिशा ॲकॅडमीने केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket