Home » राज्य » खुबा व गुडघेदुखीने त्रस्त रुग्णांसाठी गुरुवारी मोफत तपासणी शिबिर

खुबा व गुडघेदुखीने त्रस्त रुग्णांसाठी गुरुवारी मोफत तपासणी शिबिर

खुबा व गुडघेदुखीने त्रस्त रुग्णांसाठी गुरुवारी मोफत तपासणी शिबिर

सातारा, दि. ८ : आजपर्यंत ६५० एमआयएस खुबा प्रत्यारोप आणि दीड हजारांहून अधिक रोबोटिक गुडघा प्रत्यारोप शस्त्रक्रिया यशस्वी करणारे रोबोटिक शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. सौरभ गिरी येत्या गुरुवारी, १२ फेब्रुवारी रोजी दुपारी १ नंतर सातारा डायग्नोस्टिक सेंटर येथे नवीन रुग्णांची गुडघा व खुबे वेदना तपासणी मोफत करणार आहेत.

नवीन नांव नोंदणी करणाऱ्या रुग्णांची गुडघा व खुबे वेदना तपासणी मोफत होईल. फॉलोअप पेशन्टना नेहमीचे शुल्क असेल. नव्या – जुन्या अशा दोन्ही रुग्णांना एक्सरे तपासणीत ५० टक्के सवलत दिली जाईल. डॉ. सौरभ गिरी यांनी सांगितले की, पारंपरिक शास्त्रक्रियेपेक्षा रोबोटिक शस्त्रक्रिया रुग्णांसाठी अधिक फलदायी व सुखकारक आहे. रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये संभाव्य धोके टाळता येतात. संक्रमणाचा धोकाही कमी असतो. रक्तस्त्राव कमी होतो. या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण लवकर रिकव्हर होतो. त्यामुळे त्याचा रुग्णालयात ऍडमिट होण्याचा कालावधी कमी राहतो. 

रोबोटिक शस्त्रक्रियेनंतर काही तासात रुग्णाला चालता येत असल्याने रोबोटिक शस्त्रक्रिया खुबा व गुडघेदुखीने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी आशेचा किरण ठरली आहे. ज्येष्ठ नागरिक व गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी ९१६८४३२४३२ या हेल्प लाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन सातारा डायग्नोस्टिक सेंटरने केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

गजानन महाराजांच्या १४८ व्या प्रकटदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर; ३४३ जणांचे रक्तदान

गजानन महाराजांच्या १४८ व्या प्रकटदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर; ३४३ जणांचे रक्तदान निगडी प्रतिनिधी :निगडी प्राधिकरण येथील गजानन महाराज मंदिरात गजानन

Live Cricket