अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धेत कासवंड शाळेला तृतीय क्रमांक

मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धेत कासवंड शाळेला तृतीय क्रमांक

मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धेत कासवंड शाळेला तृतीय क्रमांक

भिलार-कासवंड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमात तृतीय क्रमांक पटकावून गावाच्या शैक्षणिक प्रगतीत मानाचा शिरपेच रोवला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल ग्रामपंचायत कासवंडचे सरपंच मा. जनार्दनजी चोरमले यांनी शाळेचे मुख्याध्यापक श्री.संजय कांबळे सर शिक्षक श्री.तानाजी नगरे सर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.सचिन चोरमले व सर्व सदस्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.

या स्पर्धेत शाळेच्या भौतिक सुविधा, स्वच्छता, हिरवाई, शैक्षणिक वातावरण, नाविन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थी सहभाग आणि समुदायाचा सहभाग या विविध निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. कासवंड शाळेने स्वच्छ व आकर्षक शालेय परिसर, भिंतलेखन, वृक्षारोपण, शालेय बाग, ग्रंथालय विकास, शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी यांमुळे परीक्षकांची मने जिंकली.

अभिनंदनपर कार्यक्रमात बोलताना सरपंच जनार्दनजी चोरमले म्हणाले, “शाळेचा हा सन्मान संपूर्ण गावाचा अभिमान आहे. शिक्षकांचे नियोजन, विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालक-ग्रामस्थांचा सहभाग यामुळे हे यश शक्य झाले. भविष्यातही शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत सर्वतोपरी सहकार्य करेल.”

मुख्याध्यापकांनी यावेळी शाळेच्या यशामागील टीमवर्कचा उल्लेख करत शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थांचे आभार मानले. तसेच पंचायत समिती महाबळेश्वरचे गटशिक्षणाधिकारी मा.श्री.रमेश गंबरे साहेब व भिलारचे केंद्रप्रमुख मा.श्री.संजय पारठे साहेब यांचे वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल आभार व्यक्त केले आहेत.विद्यार्थ्यांनीही विविध उपक्रमांतून सहभाग घेऊन शाळेची गुणवत्ता उंचावली असल्याचे त्यांनी नमूद केले.

या यशामुळे कासवंड गावात आनंदाचे वातावरण असून शाळेच्या पुढील प्रगतीसाठी नवे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण शाळांचा कायापालट शक्य असल्याचे हे यश अधोरेखित करते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket