जिजाऊंच्या लेकी संस्थेमार्फत उद्योजक महिलांचा सन्मान सोहळा आणि महिलासाठी उद्योग व्यवसायात डिजिटल मार्केटींगचा वापर याकरिता मोफत सेमिनार येत्या रविवार दि.28 जुलै 2024 Elite हॉटेल वाडे फाटा सातारा येते आयोजित करण्यात आला आहे.
सातारा:जिजाऊच्या लेकी सातारा संस्थेतर्फे उद्योग व्यवसाय यशस्वी करून रोजगार संधी उपलब्ध करून देणाऱ्या यशस्वी महिलांचा सन्मान सोहळा आयोजित केला असल्याची माहिती संस्थेच्या संचालिका सौ. सुप्रिया फाळके यांनी दिली.उद्योग विश्वात महिलांची मक्तेदारी दिवसेंदिवस वाढत आहे.कुटुंबातील जबाबदारी सांभाळताना महिलां उद्योग विश्वात ही यशस्वी होत आहेत.अश्याच कर्तृत्वान उद्योजक महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.
या प्रेरणादायी महिलांनी अडथळ्यांवर मात केली आहे आणि व्यावसायिक जगाला आकार दिला आहे. प्रतिकूलतेपासून ते विजयापर्यंतचे त्यांचे मार्ग जगभरातील महत्त्वाकांक्षी उद्योजक आणि महिलांना मौल्यवान धडे आणि प्रेरणा देतात.चिकाटी आणि ध्येयाप्रती असलेल्या उत्कट ध्यासाने कोणीही अत्यंत कठीण अडथळ्यांवर कसे मात करून यशस्वी उद्योजक बनू शकते याचे या महिला उदाहरण आहेत.
या समृद्ध व्यावसायिक महिलांचा सन्मान करण्यासाठी संस्थेने या उपक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती संचालकांनी दिली.
यशस्वी उद्योजिका सौ. कांचन हणमंत कुचेकर यांचा सातारा ते लंडन उद्योजकीय प्रवास याविषयी महिलांना मार्गदर्शन करणार आहेत.महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्याचबरोबर उद्योग व्यवसायात इंटरनेटच्या आधुनिक विश्वात डिजिटल मार्केटिंग द्वारे आपल्या व्यवसायाची ग्रोथ कशा पद्धतीने होईल याविषयाचा मोफत सेमिनार संस्थेने महिलांसाठी आयोजित केला असून श्री सत्यजित गुजर या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रातील व्यावसायिक संधी बाबत श्री किरण पाटील, सक्सेस अबॅकस सातारा माहिती देणार आहेत. व्यवसायात चढ उतार होत राहतात तेव्हा खचून न जाता पुन्हा जोमाने सुरुवात कशी करावी. यासाठी मानसिक स्वास्थ सांभाळणे गरजेचे असते यासाठी सौ. सविता वावरे या बिझिनेस कौन्सलिंग करणार आहेत. तसेच एक स्त्री स्वतःचा व्यवसाय् सुरु करून आज पूर्ण स्वावलंबी कशी झाली. याची सक्सेस स्टोरी सौ श्रुती चव्हाण या सांगणार आहेत. त्याचबरोबर सौ. अनिता भोसले या सई फौंडेशन यांचे मोलाचे मार्गदर्शन महिलांना देणार आहेत.त्यासोबत सौ.अर्चना देशमुख, संस्थापक अध्यक्षा कर्म प्रतिष्ठान (मा. सरपंच संभाजी नगर मा.जि .प. सदस्या कोडोली, जिल्हा नियोजन समिती सदस्या) यांचे मोलाचे सहकार्य मिळणार आहे. त्याची माहिती त्या 28 जुलै 2024 रोजी कार्यक्रमा मधेच देणार आहेत. सदर कार्यक्रम हा महिलांसाठी मोफत असून पूर्वं नाव नोंदणीसाठी या क्रमांकावर संपर्क साधावा 7387470202
रविवार दिनांक 28 जुलै 2024 Elite हॉटेल वाडे फाटा सातारा वेळ 11 ते 2 या वेळेत हा सन्मान सोहळा होणार आहे.
(टिप – हा कार्यक्रम intro म्हणून आहे . 1 वर्ष नव उदयोजिका महिलांचा ग्रुप काम करणार आहे . त्यानंतर सक्सेस इन्व्हेंट असेल. )
