अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » वनपरिक्षेत्र कोरेगांव अंतर्गत मौजे फडतरवाडी येथील राखीव वनक्षेत्रातील खैर वृक्षप्रजातीची चोरतुट प्रकरणी तीन आरोपींना वनकोठडी

वनपरिक्षेत्र कोरेगांव अंतर्गत मौजे फडतरवाडी येथील राखीव वनक्षेत्रातील खैर वृक्षप्रजातीची चोरतुट प्रकरणी तीन आरोपींना वनकोठडी

वनपरिक्षेत्र कोरेगांव अंतर्गत मौजे फडतरवाडी येथील राखीव वनक्षेत्रातील खैर वृक्षप्रजातीची चोरतुट प्रकरणी तीन आरोपींना वनकोठडी

सातारा -दिनांक. 03/02/2026 रोजी वनपरिक्षेत्र कोरेगांव मधील मौजे फडतरवाडी येथील राखीव वनकक्ष क्र. 182 मध्ये वनकर्मचारी मार्फत रात्रगस्त करत असताना रात्री 12.30 च्या दरम्यान राखीव वनक्षेत्रात चोरतुट चालु असलेली गुप्त माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी वनअधिकारी श्री चंद्रहार हणमंत जगदाळे वनपरिक्षेत्र अधिकारी कोरेगांव, श्रीमती सुरेखा राजेंद्र जगदाळे वनपाल वाठार, श्री. सुभाष दिलीप बडदे वनरक्षक वाठार श्री. विजय बाबासाहेब नरळे वनरक्षक जांब खु श्री. अजय बाजीराव कांबळे वनरक्षक वाघोली श्रीमती रूपाली गोकुळ परदेशी वनरक्षक बनवडी यांनी तात्काळ त्या ठिकाणी गेले असता चोरतुट करणारे तीन इसम पळून जातांना दिसले. त्यानंतर अधिक तपास केला असता आरोपी, आरोपी क्र.1 राहुल दुर्यधन गायकवाड रा. विखळे व आरोपी क्र.2 सुरज मिनानाथ अडागळे रा. विखळे यांनी आरोपी क्र.3 जयदिप मिनानाथ अडागळे यांच्या सांगण्यावरून कटर मशीनच्या साहाय्याने 29 खैर वृक्षाची तोड केल्याचे दिसून आले तरी सदर आरोपी यांच्या विरुदध भारतीय वनअधिनियम 1927 कलम 26 (1) (a) (f) 42, 65-A अन्वये वनगुन्हा नोंद करणेत आला आहे. सदर गुन्हयाकामी वापरण्यात आलेली मोटरसायकल क्र. MH-45-ARO476 तसेच कटर मशीन व अनगड लाकुडमाल नग 39 जप्त करून ताब्यात घेतला आहे. दिनांक 04/02/2026 रोजी सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता मा.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोरेगांव यांनी एक दिवसाची वनकोठडी सुनावली आहे.

सदरची कारवाई श्री. अमोल सातपुते, (भा.व.से.) उपवनसंरक्षक वनविभाग सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. दिगंबर जाधव, सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) सातारा, श्री चंद्रहार जगदाळे वनपरिक्षेत्र अधिकारी कोरेगांव, श्रीमती सुरेखा जगदाळे वनपाल वाठार, श्री. सुभाष बडदे वनरक्षक वाठार तसेच वनपरिक्षेत्र कोरेगांव येथील वनकर्मचारी यांचेसमवेत पार पडली असून पुढील तपास श्रीमती सुरेखा जगदाळे वनपाल वाठार करीत आहेत.

कोरेगांव वनपरिक्षेत्रातील लोकांना आव्हान करण्यात येते की, वन्यप्राणी शिकार करणे, अवैध वाहतुक, अवैध वृक्षतोड तसेच राखीव वनक्षेत्रात अतिक्रमण करणे हे कायद्याने गुन्हा आहे. असे गुन्हे घडल्यास संबंधितांवर वनविभागाकडून कडक कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket