Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » महामार्ग, द्रुतगती मार्गांवर २० किमीपर्यंत टोल माफ, फास्टॅगचीही गरज नाही

महामार्ग, द्रुतगती मार्गांवर २० किमीपर्यंत टोल माफ, फास्टॅगचीही गरज नाही

महामार्ग, द्रुतगती मार्गांवर २० किमीपर्यंत टोल माफ, फास्टॅगचीही गरज नाही

प्रतिनिधी – सध्या देशात रस्ते, महामार्ग व द्रुतगती मार्गांचं बांधकाम वेगाने चालू आहे. देशभर रस्त्यांचं मोठं जाळं तयार केलं जात आहे. त्याच गतीने देशात वाहनं आणि वाहतूकही वाढत आहे. आता या वाहनांना अधिक गती देण्यासाठी केंद्र सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार तुम्ही महामार्ग व एक्सप्रेस वेवर वाहन चालवत असाल तर २० किमीपर्यंत तुम्हाला कोणताही टोल भरावा लागणार नाही. केंद्र सरकारने ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिम (GNSS) असलेल्या खासगी वाहनांना २० किमीपर्यंतच्या टोलमधून सूट दिली आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम २००८ मध्ये संशोधन केलं आहे. त्यानुसार केंद्र सरकारने जीपीएस आधारित टोल प्रणालीला मान्यता दिली आहे. ज्या वाहनांमध्ये जीपीएस प्रणाली असेल त्या वाहनांना आता टोल नाक्यांवर थांबावं लागणार नाही. तसेच त्यांना फास्टॅगचीही गरज भासणार नही. नवीन सॅटेलाइट आधारित प्रणालीद्वारे केवळ वाहनांवरील नंबर प्लेटच्या मदतीने टोल टॅक्स कापला जाईल. वाहन महामार्गांवर किती किलोमीटर चालवलं आहे त्यानुसार टोल कापला जाईल. या वाहनधारकांना टोल नाक्यावर थांबावं लागणार नाही, त्यांना फास्टॅग बाळगण्याची आवश्यकता नाही, तसेच रोख पैसेही द्यावे लागणार नाहीत. हे वाहनधारक कोणत्याही अडथळ्याशिवा सुसाट प्रवास करू शकतात.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket