अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या चेअरमनपदी मा.श्री.विशाल विलास कणसे व व्हा.चेअरमनपदी मा.श्री.नितीन अशोक राजे यांची सर्वानूमते निवड

प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या चेअरमनपदी मा.श्री.विशाल विलास कणसे व व्हा.चेअरमनपदी मा.श्री.नितीन अशोक राजे यांची सर्वानूमते निवड

प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या चेअरमनपदी मा.श्री.विशाल विलास कणसे व व्हा.चेअरमनपदी मा.श्री.नितीन अशोक राजे यांची सर्वानूमते निवड

सातारा :-महाराष्ट्र राज्य प्राथमिक समितीचे नेते मा.उदय शिंदे व अखिल भारतीय शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष व नेते मा.सिध्देश्वरजी पुस्तके यांचे नेतृत्वाखाली प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि.साताराचे चेअरमनपदी मा.श्री.विशाल विलास कणसे व व्हा.चेअरमनपदी मा.श्री.नितीन अशोक राजे यांची सर्वानूमते निवड करण्यात आली.

बँकेचा कारभार महाराष्ट्र राज्य प्राथमिक समितीचे नेते मा.उदय शिंदे, व अखिल भारतीय शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष व नेते मा.सिध्देश्वर पुस्तके, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे संयुक्त चिटणीस मा.दिपक भुजबळ, सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष मा.विश्वंभर रणनवरे, सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मा.चंद्रकांत यादव व मा.मोहनराव निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सातारा जिल्हयातील प्राथमिक शिक्षकांची अर्थवाहिनी असलेल्या प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या चेअरमन व व्हा.चेअरमन या पदाची निवडणूक अध्यासी अधिकारी श्री.राहुल देशमुख, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, सातारा यांचे अध्यक्षतेखाली बुधवार दि.२९-०७-२०२६ रोजी बँकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात होवून बँकेचे चेअरमनपदी मा.श्री.विशाल विलास कणसे व व्हा.चेअरमनपदी मा.श्री.नितीन अशोक राजे यांची निवड करण्यात आलेचे मा.राहुल देशमुख यांनी घोषीत केले.

नवनिर्वाचित चेअरमन मा.श्री.विशाल विलास कणसे व व्हा.चेअरमन मा.श्री.नितीन अशोक राजे यांचा सर्व मार्गदर्शक नेते व संचालक सदस्य यांनी निवडी बद्दल सत्कार केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

बँकेच्या पारदर्शक कारभारासाठी कटिबध्द राहू… – मा.श्री.विशाल कणसे

सत्कारास उत्तर देताना नवनिर्वाचित चेअरमन मा.श्री.विशाल विलास कणसे यांनी बँकेचा कारभार पारदर्शक कारभारासाठी कटिबध्द राहू तसेच प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेला मोठा नाव लौकिक आहे या नाव लौकिकाला शोभेल असे काम करणार आहे. तसेच सभासद हित कायम डोळयासमोर राहिल हेच उद्दिष्ट आहे.

नवनिर्वाचित चेअरमन मा.श्री.विशाल विलास कणसे व व्हा.चेअरमन मा.श्री.नितीन अशोक राजे यांनी सर्वांचे आभार मानून सर्वांच्या विचाराने व मार्गदर्शनाखाली कारभार करणार असल्याची ग्वाही दिली.

यावेळी बँकेचे माजी चेअरमन मा.श्री.विजय रत्नराज ढमाळ, माजी व्हा.चेअरमन मा.श्री.नितीन विठोबा फरांदे, संचालक ज्ञानबा ढापरे, नितीन काळे, किरण यादव, सौ.पुष्पलता बोबडे, सौ.निशा मुळीक, महेंद्र जानुगडे, तानाजी कुंभार, विजय शिर्के, संजय संकपाळ, शशिकांत सोनवलकर, राजेंद्र बोराटे, नितीन शिर्के, सुरेश पवार, नवनाथ जाधव, शहाजी खाडे, संजीवन जगदाळे, विजय बनसोडे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी आण्णासाहेब भोसले तसेच सभासद बंधू भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket