Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » महाबळेश्वरमधील वाहतूक कोंडी सुटली, मुख्याधिकारी योगेश पाटील यांचे कौतुक

महाबळेश्वरमधील वाहतूक कोंडी सुटली, मुख्याधिकारी योगेश पाटील यांचे कौतुक

महाबळेश्वरमधील वाहतूक कोंडी सुटली, मुख्याधिकारी योगेश पाटील यांचे कौतुक

महाबळेश्वर, 8 जून: उन्हाळी हंगामाच्या शेवटी, महाबळेश्वर शहरातील दोन्ही मुख्य चौकांमधील वाहतूक कोंडी सुटल्याने नागरिक आणि पर्यटकांनी समाधान व्यक्त केले आहे. या यशस्वी नियोजनाचे श्रेय पालिकाध्यक्ष योगेश पाटील यांना दिले जात आहे.

पूर्वी, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि सुभाषचंद्र बोस चौक सतत वाहतूक कोंडीने त्रस्त होते. अनेक हातगाड्या, घोङे व्यावसायिक आणि टॅक्सी रस्त्यावर उभ्या राहून वाहतूक अडवत असत. यामुळे पर्यटकांना बाजारपेठेत प्रवेश करण्यास त्रास होत होता.

पालिका मुख्याधिकारी श्री योगेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील पालिकेने अतिक्रमण विरोधी पथक स्थापन करून चौकातील हातगाड्या हटवल्या. सायंकाळी टॅक्सी पार्किंग बंद करण्यात आले आणि पर्यटकांना वाहने उभ्या करण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून दिली गेली. यामुळे वाहतूक कोंडी सुटली आणि चौकातील प्रवास सुकर झाला.

पालिकेचे कर्मचारी हाशम वारूणकर यांनी या नियोजनाची जबाबदारी घेत चौकावर सतत उपस्थित राहून ते राबवले. त्यांच्या कठोर परिश्रमामुळे हे यश मिळाले.

उन्हाळी हंगामात शहरातील दोन्ही प्रमुख चौकांमधील वाहतूक नियोजन सुव्यवस्थितपणे राबवून मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी नागरिक आणि पर्यटकांची मने जिंकली आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उत्कर्षाच्या शिखरावर कार्यक्रमात प्रा नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न. 

उत्कर्षाच्या शिखरावर कार्यक्रमात प्रा नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न.  उत्कर्ष पतसंस्था आयोजित “उत्कर्षाच्या

Live Cricket