उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर जावळी तालुक्यातील जनतेचा पुर्ण विश्वास आहे. त्यामुळे कुसुंबी जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार कविता एकनाथ ओंबळे यांचा विजय निश्चित-एकनाथदादा ओंबळे
मेढा(प्रतिनिधी)-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेना राज्यातील तळागाळातील सर्वसामान्य जनतेच्या उत्कर्षासाठी अहोरात्र काम करत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर जावळी तालुक्यातील जनतेचा पुर्ण विश्वास आहे. त्यामुळे कुसुंबी जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार कविता एकनाथ ओंबळे यांचा विजय निश्चित आहे.असा विश्वास शिवसेना जिल्हा सह संपर्क प्रमुख एकनाथदादा ओंबळे यांनी व्यक्त केला.
जावळी तालुक्यातील दक्षिण विभागात मतदारांशी संवाद साधताना ओंबळे बोलत होते. शिवसेना म्हणजे संघर्ष , शिवसेना म्हणजे एक चळवळ आहे . आमची लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे . तसेच समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून कायम संघर्ष करत आलो आहे . जनतेचे प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोडविण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्या . असे आवाहन शिवसेनेचे संपर्कप्रमुख अंकुश बाबा कदम यांनी केले .
शिवसेनेचे कुसुंबी जि प गटाचे उमेदवार कविताताई ओंबळे , पंचायत समिती आंबेघर तर्फ मेढा गणाचे उमेदवार आतिष कदम, कुसुंबी गणाचे उमेदवार सुनिता दुंदळे यांच्या प्रचारार्थ कुसुंबी दक्षिण विभागातील सायळी , धनकवडी , काळोशी , करंडी , मालचौंडी , दुंद , कुसुंबी , गांजे , लिगाडेवाडी , मोहाट आदि गावे , वाड्या वस्त्यांवर प्रचार दौरा केला .
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष साधू चिकणे , शिवसेना ( उबाठा ) तालुकाधक्ष संतोष चव्हाण , विठ्ठल पवार , विलास दुंदळे , शंकर वेंदे , संतोष शेलार , अमृतलाल शेडगे , संजय कदम , राम कदम ,चंद्रकांत धनावडे , दत्तात्रय कदम , संतोष रेवले , युवराज शेडगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते .
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष साधू चिकणे म्हणाले , प्रस्थापित भाजपाच्या विरोधात ही जनशक्ती एकवटली आहे . सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी . त्यांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी दोन्ही शिवसेना , राष्ट्रवादीसह इतर पक्ष एकत्र येऊन लढा देत आहोत . त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे . आरोग्यदूत , सामाजिक कार्यकर्ते एकनाथ (दादा) ओंबळे यांच्या निस्वार्थी समाज कार्यामुळे माझा विजय निश्चित आहे . असे शिवसेनेचे उमेदवार कविताताई ओंबळे यांनी सांगितले .
कुसूंबी दक्षिण विभागातील गावा गावात , घरात कार्यकत्यांनी पत्रके वाटत आपले मत शिवसेनेला , आपले मत धनुष्य बाणाला असे पटवून देत उमेदवारांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या . यावेळी गावागावात स्वागत करण्यात आले . ग्रामस्थ , महिला , युवक उपस्थित होते .



