सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर!
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » नागेवाडी परिसरात अखेर उभारले अधिकृत आयटी पार्कचे फलक तरुणाईची होणार स्वप्नपुर्ती,रोजगाराची मिळणार संधी.

नागेवाडी परिसरात अखेर उभारले अधिकृत आयटी पार्कचे फलक तरुणाईची होणार स्वप्नपुर्ती,रोजगाराची मिळणार संधी.

सातारा -(श्रीरंग काटेकर)नागेवाडी परिसरात अखेर उभारले अधिकृत आयटी पार्कचे फलक

तरुणाईची होणार स्वप्नपुर्ती,रोजगाराची मिळणार संधी.

लिंब-सातारकर भुमिपुञ ज्या क्षणाची गेल्या कित्येक वर्षापासून आतुरतेने वाट पाहत होते ते आयटी पार्कचे स्वप्न अखेर पूर्ण होण्याच्या वाटेवर असल्याचे दिसून येत आहे.लिंबखिंड येथील नागेवाडी परिसरात आयटी पार्कची उभारणी करण्याचे ध्येय ठेवून श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या परिसरात अद्यावत व सुसज्ज असे आयटी पार्क आता सत्यात उतरवण्याचा निर्धार केला आहे.यासाठी त्यांनी शासकीय पातळीवर हालचाली गतिमान केल्या आहेत.दिनांक ९ मार्च २०२६ रोजी नागेवाडी परिसरात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यावतीने या ठिकाणी प्रस्तावित आयटी पार्कच्या फलकाची उभारणी झाली आहे.या फलक उभारणीमुळे स्थानिक भुमिपुञ व तरुणाईमध्ये उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.सातारा शहरातील तरुणाईला भविष्यकाळात या परिसरात व्यवसाय व नोकरीची संधी उपलब्ध होणार असल्याने आता अन्य शहराकडे धाव घेण्याची गरज भासणार नाही.सातारा शहर हे नजीकच्या काळात पेन्शन शहर म्हणून नव्हे तर उद्योग सिटीचे शहर म्हणून ओळखले जाईल.अर्थात हे परिवर्तन घडवण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व उद्योग मंत्री उदय सामंत यांचे लाभलेले पाठबळ तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तर नागेवाडी येथील हे आयटी पार्क, हिंजवडी पुणे एमआयडीसीच्या धर्तीवर उभे करण्याचा ध्यास घेतला आहे.उद्योजकांना व उद्योगपतींना आकर्षित करण्यासाठी या ठिकाणी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने निधीची उपलब्ध करण्याचेही निश्चित केले आहे.नजीकच्या काळात या परिसराचा पूर्णपणे कायापालट होऊन या परिसराला उद्योग विश्वाचे स्वरूप प्राप्त होणार याची खात्री आता सातारकरांना वाटू लागली आहे.११३ एकराच्या जागेत पहिल्या टप्प्यातील आयटी पार्कची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांनी दिली आहे. 

 साताऱ्यात उच्च शिक्षणावर आधारित शिक्षण संस्था उपलब्ध आहेत या माध्यमातून निर्माण होणारा कुशल मनुष्यबळास आता नागेवाडी येथील आयटी पार्क मध्ये संधी मिळणार आहे.साताऱ्यातील भूमिपुत्र हे नोकरी व व्यवसायासाठी अन्य शहरात धाव घेत असतात त्यांच्यासाठी आता ही धावपळ निश्चितपणे थांबणार आहे.श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अथक परिश्रमाला अखेर यश येताना दिसून येत आहे. 

श्रीरंग काटेकर सातारा.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सातारा वनपरिक्षेत्रातील ग्रामस्थांची बैठक सातारा प्रतिनिधी -अधिकारी

Live Cricket