दि कराड अर्बन सेवक सहकारी पतसंस्थेची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
दि.कराड अर्बन सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित, कराड ची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पंकज मल्टीपर्पज हॉल, हॉटेल पंकजचे मागे, शनिवार पेठ, कराड येथे रविवार दि.२०/०७/२०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता पार पडली. सभेसाठी विशेष उपस्थिती मा.अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी, अर्बन बँकेचे मा. अध्यक्ष सुभाषराव एरम, मा. उपाध्यक्ष समीर जोशी, पतसंस्थेचे मार्गदर्शक व संस्थापक अध्यक्ष मा. सीए दिलीप गुरव व सर्व संचालक संस्थेचे सभासद यांची उपस्थिती ही उल्लेखनीय होती.
सदर सभेत संस्थेचे सचिव श्री. किरण हणमंत मोटे यांनी प्रास्ताविक व सभेचे नोटीस वाचन केले. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष सलीम नुरंमहमद शेख यांनी संस्थेच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला. संस्थेची गेल्या पंधरा वर्षातील वाटचाल दि कराड अर्बन को. ऑप बँक, दि कराड अर्बन ग्राहक संस्था, डॉ.द शि. एरम अपंग सहाय्य संस्थेचे मुकबधीर विद्यालय, कराड महिला गृह उद्योग, इ. सहयोगी संस्थेतील सेवकांना आर्थिक उन्नती देणारी ठरली आहे. संस्थेचे सभासद ९२८ आहेत. संस्थेचे भागभांडवल रक्कम रु.१ कोटी ९० लाख आहे. संस्थेच्या ठेवी रक्कम रु.११७९.१६ लाख आहेत. संस्थेचे ठेवीचे व्याजदर आकर्षक आहेत.
तर कर्जे रक्कम रु.१०१८.६९ लाख अदा केलेली आहे. संस्थेने ३१ मार्च २०२५ अखेर ८ कोटी १३ लाखाची गुंतवणूक केलेली आहे. संस्थेकडे राखीव व इतर निधी रक्कम रु.१ कोटी २० लाख इतका आहे. संस्थेला सन २०२४-२५ साठी रक्कम रु.४१.५२ लाख इतका नफा झालेला असून त्याचा विनियोग पतसंस्थेच्या सभासदांना दरसाल आकर्षक भेटवस्तू तसेच आर्थिक मदत देण्याकरिता करीत आहे. संस्थेला अहवाल सालात ऑडीट वर्ग “अ” मिळाला असून संस्थेचा NPA 0% आहे. संस्थेच्या सर्व संचालकांनी सामाजिक बांधिलकी आणि कृतज्ञता म्हणून मा.डॉ.द.शी.एम मुकबधीर विद्यालयास देणगी म्हणून रक्कम रु.५ लाखाचा निधी दिला आहे. संस्थेचे उपाध्यक्ष श्री. अतुल शिंदे यांनी नफा वाटणीचा ठराव मांडून सभासदांसाठी ११ % लाभांश घोषित केला.
सदर सभेस संस्थेचे संचालक गिरीश सिहासने, संदीप पवार, राजेंद्र कांबळे, प्रदीप कदम, प्रशांत दळवी, अमर भोकरे, किरण मोटे, व्यवस्थापिका सबिना इनामदार उपस्थित होते. संस्थेस अर्बन कुटुंब प्रमुख मा. सुभाषराव जोशी, अर्बन बँकेचे मा. अध्यक्ष सुभाषराव एरम, मा. उपाध्यक्ष समीर जोशी, पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. सीए दिलीप गुरव, बँकेचे प्रभारी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. धनंजय शिंगटे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. संस्थेच्या या यशस्वी वाटचालीचे सर्वस्वी श्रेय आपल्या सभासदांना तसेच सेवक वर्ग यांच्या कृतीशील व कष्टपूर्ण योगदानाला आहे. आपला विश्वास, प्रेम, आपुलकी यामुळेच ही प्रगती उत्तम रीतीने सुरु आहे. संस्थचे उपाध्यक्ष श्री. अतुल शिंदे यांनी सर्व उपास्थितांचे मनपूर्वक आभार मानले.





