यशोदा इन्स्टिट्यूट चा संस्कार मय शिक्षणाचा प्रवास प्रशंसनीय: डॉ. संजय कळमकर
यशोदा इन्स्टिट्यूट चे ज्ञानार्जनाचे कार्य विलोभनीय:डॉ. संजय कळमकर
यशोदा इन्स्टिट्यूट चा शैक्षणिक प्रवास प्रेरणादायी: डॉ. संजय कळमकर
यशोदा इन्स्टिट्यूट चा सोळावा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न, विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जपण्याचे आवाहन
स्थापना दिनाचा समारंभ विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
यशोदा इन्स्टिट्यूट चे आजवरचे ज्ञानर्जनाचे कार्य हे अत्यंत विलोभनीय आहे, यशोदा इन्स्टिट्यूट चा संस्कार शील शिक्षणाचा प्रवास हा प्रशंशनीय आणि प्रेरणा देणारा आहे. यशोदा इन्स्टिट्यूट चे रूपांतर लवकरच विद्यापीठात व्हावे अशी इच्छा असल्याचे प्रतिपादन ख्यातनाम साहित्यिक, ज्येष्ठ लेखक आणि प्रबोधनात्मक व्याख्याते डॉ. संजय कळमकर यांनी केले.
यशोदा इन्स्टिट्यूट च्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभामध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी यशोदा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे हे होते.
यावेळी प्रमुख मान्यवरांमध्ये सचिव साधना सगरे, उपाध्यक्ष अजिंक्य सगरे, शशिकांत पारेख, स्वराली भिलारे, संजय मोरे, अतुल माळी, संजय कदम, संजय शेलार, प्राचार्य अनिल बोधे, पिंटू नायकवडी, राजेश वंजारी, दयानंद गाडे, भाऊ पडघम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना संजय कळमकर म्हणाले यशोदा शिक्षण संस्थेच्या रूपाने सातारा सह परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार तंत्रशिक्षण आणि व्यावसायिक शिक्षणाची गंगोत्री प्राप्त झाली आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारे ऋषितुल्य प्रा. दशरथ सगरे यांनी अत्यंत संघर्षातून वाटचाल करत या स्वरूपाची शैक्षणिक क्रांती घडवून आणली आहे. येथील विविध शाखेतील विद्यार्थी हे खेळासोबतच अभ्यासामध्ये देखील अग्रगण्य आहेत. आणि संस्कार मय पिढी घडवण्याच्या दृष्टीने विद्यार्थी आणि शिक्षकांनी देखील वाचन संस्कृती जोपासली पाहिजे आणि ती समृद्ध केली पाहिजे असे देखील ते म्हणाले. जीवनामध्ये आनंदी राहणे ही अत्यंत महत्त्वाचे असून कोणत्याही स्वरूपाच्या प्रलोभनांना बळी न पडता वेळेचा सुयोग्य वापर करण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला.
यावेळी अध्यक्षीय भाषणात प्रा. दशरथ सगरे यांनी संस्था स्थापनेपासूनच्या वर्धापन दिनांचा थोडक्यात आढावा घेताना आपण नेहमीच शिक्षक आणि विद्यार्थ्यांना प्रगल्भ विचारांची शिदोरी मिळावी म्हणून अनेक नामवंत साहित्यिक, लेखक आणि शिक्षण क्षेत्रातील नामांकित व्यक्तिमत्त्वांना आमंत्रित केले असल्याचे त्यांनी सांगितले. परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे उपलब्ध असणारे साहित्य वाचून विद्यार्थी आणि शिक्षकांनी अधिक प्रगल्भ होण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. माणसाच्या आयुष्यामध्ये साधेपणा अत्यंत महत्त्वाचा असून, विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी अत्यंत नम्रपणे शिक्षणाचा हा प्रवास पूर्ण करावा असे ते म्हणाले. यावेळी कै. शामराव बळवंतराव माळी यांचे स्मृती पित्यर्थ त्रिमूर्ती बँक साताराचे अतुल माळी यांचे वतीने संस्थेतील गुणवंत -गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले.
अहवाल सालातील गुणवंत प्राध्यापक गुणवंत शिक्षक, खेळामध्ये विशेष प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी, आणि यशोदा इन्स्टिट्यूट च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या स्फूर्ती 2024 या स्पर्धांमधील पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. अहवाल सालातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन कार्य करणाऱ्या प्राध्यापकांना देखील विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यशोदा टेक्निकल कॅम्पस मधील पीएचडी पदवी संपादन करणाऱ्या प्राध्यापकांचा देखील सन्मान करण्यात आला. यशोदा परिवारातील ज्या शिक्षकांचे पुस्तक प्रकाशनाचे कार्य पूर्ण झाले आहे अशा शिक्षकांना देखील सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन झाल्यानंतर, साधना इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी आणि यशोदा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीताचे गायन केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत एनसीसी कॅडेट च्या विद्यार्थ्यांनी संचलन करत मोठ्या उत्साहात केले.
यशोदा शिक्षण संस्थेचा वार्षिक अहवालाचे वाचन प्राचार्य चरणीकांत भोसले तर यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वार्षिक अहवालाचे वाचन संचालक व्ही के रेदासणी यांनी केले. प्रास्ताविक कुलसचिव श्री गणेश सुरवसे यांनी केले, प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देताना सहसंचालक प्रा. रणधीरसिंह मोहिते यांनी उपस्थित मान्यवरांच्या साहित्य कलाकृतींचा आदर सन्मान व्यक्त केला. यावेळी उपस्थित त्यामध्ये प्राचार्य डॉ. विक्रम पाटील, प्राचार्य आर्कि. सुहास तळेकर, प्राचार्य डॉ. विठ्ठल चावरे, प्राचार्य प्रवीण गावडे यांच्यासह विभाग प्रमुख, शाखाप्रमुख उपस्थित होते. आभार मुख्याध्यापिका वनिता जाधव यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन सौ वैशाली घोरपडे, सौ प्रिया इंगवले व सुप्रिया सौ. भांडवलकर यांनी केले. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसह समाजातील विविध घटकातील मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
