आधुनिक आरोग्यसेवेचा विश्वासार्ह चेहरा आदरणीय निलेश बळी सर यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास; वाढदिवसानिमित्त घेतलेला कार्याचा आढावा
सातारा (अली मुजावर )-आरोग्य क्षेत्रात सामाजिक दायित्व जपत सर्वसामान्य रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणारे आदरणीय निलेश बळी सर यांचा आज वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा होत आहे. स्वतःच्या मेहनती, जिद्द, दूरदृष्टी आणि सेवाभावी वृत्तीच्या जोरावर त्यांनी आरोग्य क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर प्रायव्हेट लिमिटेड च्या माध्यमातून सिटीस्कॅन, डॉपलर, 2D ईको, ECG, डिजिटल एक्स-रे, OPG, 3T फीचर MRI तसेच पॅथॉलॉजीसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त सेवा 24 तास, 365 दिवस रुग्णांसाठी उपलब्ध करून देत त्यांनी हजारो रुग्णांना दिलासा दिला आहे. अचूक निदान, तत्पर सेवा आणि रुग्णांप्रती आत्मीयता यामुळे त्यांच्यावर नागरिकांचा मोठा विश्वास निर्माण झाला आहे.
सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या निलेश सरांनी संघर्ष आणि कष्टाच्या बळावर यशाचे शिखर गाठले. सुरुवातीच्या काळात त्यांनी कोरेगाव येथे अद्ययावत लॅबच्या माध्यमातून नागरिकांना उत्कृष्ट सेवा दिली. त्यानंतर पाटण वाई सातारा कराड या शहरात आणि महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी अत्याधुनिक सेंटर उभारून दर्जेदार सुविधा रुग्णांना उपलब्ध करून दिल्या.
अनुभव, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव यांच्या जोरावर त्यांनी सातारा जिल्ह्यात आरोग्यसेवेचे मजबूत जाळे उभे केले. कराड, पाटण, वाई, सातारा आणि फलटण या तालुक्यांमध्ये अत्यंत विश्वासार्ह व गुणवत्तापूर्ण सेवा देत त्यांनी नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि रुग्णसेवेची तळमळ यामुळे निलेश बळी सरांचे नाव आज संपूर्ण महाराष्ट्रात आदराने घेतले जाते.
त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले आरोग्यसेवेचे कार्य दिवसेंदिवस अधिक व्यापक होत आहे. शेकडो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांनी सामाजिक बांधिलकीही जपली आहे. आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना अनेक सामाजिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
साधी राहणी, संयमी वाणी, सर्वसामान्यांप्रती असलेली आत्मीयता आणि सेवाभावी स्वभाव ही त्यांची खरी ओळख आहे. समाजातील प्रत्येक घटकाला आरोग्यसेवेचा आधार मिळावा, या ध्येयाने ते सातत्याने कार्यरत आहेत.
आदरणीय निलेश बळी सर यांना वाढदिवसानिमित्त उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील सामाजिक व आरोग्यसेवेसाठी भरभरून यश लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
🎂 वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐




