सकाळच्या नास्त्यात तर्री पोहा; शेतकरी कुटुंबात मुख्यमंत्र्यांची भाऊबीज पुढल्या वर्षी वहिनींना घेऊन या; अरूणाताईंचा मुख्यमंत्र्यांना आग्रह दिव्यांगांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी साजरी केली दिव्यांग बांधवांसोबत आनंदाची दिवाळी! सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल ह.भ.प. दत्तात्रय कळंबे महाराज नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्थेतर्फे रूपाली राजपुरे व राजेंद्रशेठ राजपुरे यांचा सत्कार दुष्काळग्रस्त ८७ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना ४,३७२ कोटींची दिवाळी अग्रीम मदत-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील दुष्काळी परिस्थितीत गायरान व वैयक्तिक जमिनीवर अतिरिक्त चारा पिकांच्या लागवडीला मान्यता-रोहयो मंत्री भरत गोगावले माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तालुकानिहाय दौरे
Home » Uncategorized » नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह सुशोभीकरण उद्घाटन समारंभ संपन्न

नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह सुशोभीकरण उद्घाटन समारंभ संपन्न 

नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह सुशोभीकरण उद्घाटन समारंभ संपन्न 

पाचगणी प्रतिनिधी- पाचगणी शहरातील प्रभाग क्रमांक दोन येथील आंबेडकर हाऊसिंग सोसायटीमध्ये असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहाच्या सुशोभीकरण कामाचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभाचे उद्घाटन नगराध्यक्ष दिलीप भाऊ बगाडे व मुख्याधिकारी पंडित पाटील तसेच घाटजाई विकास आघाडीचे नवनिर्वाचित नगरसेवक यांच्या हस्ते करण्यात आले.

नगरसेवक शेखर कासुर्डे, नरेंद्र बिरामने, आकाश बगाडे, विमल भिलारे, अमित कांबळे, राजश्री सणस, परवीन मेमन, महेश खांडके, प्रकाश गोळे, राजेंद्र पारठे, स्वाती कांबळे, अमृता गोळे, शिल्पा माने, माधुरी कासुर्डे व सुप्रिया माने आदी मान्यवराची उपस्थिती होती.

यावेळी प्रभाग क्रमांक दोनचे नगरसेवक नारायणशेठ बिरामने व सुप्रिया माने यांनी उपस्थित पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हाऊसिंग सोसायटीचे संचालक मंडळ व पंचशील युवक मंडळ यांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार व स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाची सांगता श्री. प्रकाश मोरे गुरुजी यांनी केली. या प्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी नितीन कांबळे, संचालक संपत खरात, माजी उपाध्यक्ष सतीश साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते अरुण भाऊ कांबळे, हौसाताई गायकवाड, रंजना घाडगे, सुनील भाऊ भोसले, कुमार कांबळे, संदीप गायकवाड, सिद्धार्थ घाडगे, सुरज कांबळे, किशोर मस्के, शब्देश मोरे, प्रशांत मोरे, अमरशेठ बिरामणे, मोहिनी गायकवाड, कमलताई शिंदे, सागर बोलके, विजय कांबळे, विकास बिरामणे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.या सुशोभीकरणामुळे सामाजिक, सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी सभागृह अधिक सुसज्ज होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सकाळच्या नास्त्यात तर्री पोहा; शेतकरी कुटुंबात मुख्यमंत्र्यांची भाऊबीज पुढल्या वर्षी वहिनींना घेऊन या; अरूणाताईंचा मुख्यमंत्र्यांना आग्रह

सकाळच्या नास्त्यात तर्री पोहा; शेतकरी कुटुंबात मुख्यमंत्र्यांची भाऊबीज पुढल्या वर्षी वहिनींना घेऊन या; अरूणाताईंचा मुख्यमंत्र्यांना आग्रह नागपूर : दुष्काळामुळे हवालदिल

Live Cricket