Post Views: 54
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात मनोजदादा घोरपडे विरुद्ध आमदार बाळासाहेब पाटील अंतिम लढत होणार
तुतारी विरुद्ध कमळ हाय व्होल्टेज लढत रंगणार
सातारा (अली मुजावर )भारतीय जनता पार्टीने आज महाराष्ट्रातील विधानसभा उमेदवारांची अधिकृत पहिली यादी जाहीर केली. सातारा जिल्ह्यामधून शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे,अतुल भोसले यांना उमेदवारी देण्यात आली.दुसऱ्या यादीमध्ये कराड उत्तरमध्ये भाजपचे युवानेतृत्व मनोज घोरपडे यांच्याच नावावर शिक्का मोर्तब झाले असून याबाबत निव्वळ औपचारिकता राहिली आहे.
कराड उत्तर या विधानसभा मतदारसंघात तुतारी या चिन्हावर विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील हे उमेदवार असल्याने या मतदारसंघात तुतारी विरुद्ध कमळ अशी थेट लढत होणार आहे.
