टोलविरोधात पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचं सर्वात मोठं आंदोलन
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेसंदर्भात काँग्रेसने येत्या शनिवारी 3 ऑगस्ट रोजी आंदोलनाची हाक दिली आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,आमदार विश्वजीत कदम , काँग्रेस नेते संग्राम थोपटे, विराज शिंदे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते सहभागी होणार आहेत.
काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रात (Congress Protest against Toll) मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे. टोल माफ व्हावा, टोलमध्ये सवलत मिळावी यासाठी मोठं आंदोलन उभं केलं जाणार आहे. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेसंदर्भात काँग्रेसने येत्या शनिवारी 3 ऑगस्ट रोजी आंदोलनाची हाक दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्यासह काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व बडे नेते एका एका टोल नाक्यावर उभं राहून, आंदोलन करणार आहेत.