Home » राज्य » शेत शिवार » अर्ज भरायला आलेल्या जनतेनेच जयभाऊंचा चौकार निश्चित केलाय -सोनिया गोरे

अर्ज भरायला आलेल्या जनतेनेच जयभाऊंचा चौकार निश्चित केलाय  -सोनिया गोरे

अर्ज भरायला आलेल्या जनतेनेच जयभाऊंचा चौकार निश्चित केलाय  -सोनिया गोरे 

भाजपाची विचारधारा स्विकारणाऱ्यांचा ओघ वाढतोय 

सातारा : प्रतिनिधी आ.जयकुमार गोरे यांनी १५ वर्षांपूर्वी माण – खटावच्या जनतेला दुष्काळी कलंक पुसण्याचा दिलेला शब्द आज अंतिम टप्प्यात आणला आहे. त्यासाठी त्यांनी अहोरात्र संघर्ष आणि परिश्रम केले आहे. गावोगावी विकासकामांचा झंझावात उभा केला आहे. मतदारसंघात कार्यकर्त्यांची मजबूत फळी निर्माण केली आहे. मायबाप जनतेने भाऊंना नेहमीचे आशिर्वाद दिले आहेत. निवडणूकीचा अर्ज भरायला आलेल्या गर्दीने त्यांचा विधानसभा निवडणूकीतील चौकार निश्चित केला असल्याचे प्रतिपादन सोनिया गोरे यांनी केले. 

 पिंपरी येथे आयोजित कोपरा सभेत त्या बोलत होत्या. यावेळी शिवाजीराव शिंदे,ॲड. हांगे, नितीन दोशी,चंद्रकांत शिलवंत, नानासाहेब गायकवाड, सदाशिव खाडे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.  

सोनिया गोरे पुढे म्हणाल्या, जनतेसाठी २४ × ७ उपलब्ध राहून अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या जयाभाऊंच्या पाठिशी उभे रहाण्यासाठी मतदारसंघातून कार्यकर्त्यांचा ओघ वाढला आहे. जलक्रांतीचे स्वप्न पूर्णत्वाला जाताना आता शैक्षणिक आणि औद्योगिक क्रांतीसाठी सर्वांनी आ. गोरेंना आशिर्वाद द्यावेत असे आवाहनही त्यांनी केले. 

 शिवाजीराव शिंदे म्हणाले, विकासाच्या वाटेवर जाताना जनता एकजूट होवून जयाभाऊंच्या पाठिशी उभी रहात आहे. जनतेची अहोरात्र सेवा करणारा, पाणी आणून काळ्या आईचे ऋण फेडणारा, अडचणीच्या काळात धावून येणारा भाऊंसारखा लोकप्रतिनिधी जनतेला हवा आहे. गेली १५ वर्षे त्यांनी विधानसभेत पाणीप्रश्नासह माण – खटावच्या विकासाचेच मुद्दे विधानसभेत मांडले. देवेंद्र फडणवीसांच्या सहकार्याने त्यांना पाणी योजना मार्गी लावण्यात यशही आले आहे. विरोधकांनी मात्र आमदारांच्या वाटचालीत अडथळे आणायचेच काम केले. आघाडीची सत्ता असताना विरोधकांनी मतदारसंघात एकही काम केले नाही असा टोलाही त्यांनी लगावला. 

पवारांनीच सांगितले, देशमुख तुम्ही पडताय ……

विधानसभा निवडणूक लढवायला प्रभाकर देशमुखांसह अनेकजण इच्छुक होते. आ. गोरेंनी पाणीप्रश्नासह अनेक विकासकामे मार्गी लावल्याने त्यांचे पारडे जड आहे. देशमुख तुम्ही मोठ्या फरकाने पडताय असे पवारांनी सांगताच त्यांनी माघार घेतली. बाकी इच्छुकांनी तर शेपूटच घातले. मांडवली करुन घार्गेंचे सावज हेरुन मातीशी प्रतारणा करणारे सगळे तळवेचाटू एकत्र आले आले आहेत. 

– शिवाजीराव शिंदे – 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket