वाई नगरपालिका भाजपाच्या ताब्यात; दीपकदादा ननावरे ठरले विजयाचे सूत्रधार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अल्पमुदतीच्या प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याचे आवाहन मांढरदेव श्री क्षेत्र काळूबाईदेवीची यात्रा सुरक्षित वातावातावरणात पार पाडण्यासाठीसर्व यंत्रणांनी समन्वयाने कामे करा- जिल्हाधिकारी संतोष पाटील पाचगणीच्या विकासाचे शिल्पकार नानासाहेब कासुर्डे यांचा अमृतमहोत्सव उत्साहात लोणंद येथे युवकास बेदम मारहाण करून दुचाकी हिसकावणाऱ्या फायनान्स कंपनीच्या लोकांवर तात्काळ गुन्हा दाखल करा-अभिजीत (सनी) ननावरे ग्राहक कल्याण फाउंडेशन महाराष्ट्र राज्यच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी प्रमोद लक्ष्मण माने, उपाध्यक्षपदी महादेव भिलारे
Home » राज्य » शिक्षण » पाचगणीच्या विकासाचे शिल्पकार नानासाहेब कासुर्डे यांचा अमृतमहोत्सव उत्साहात

पाचगणीच्या विकासाचे शिल्पकार नानासाहेब कासुर्डे यांचा अमृतमहोत्सव उत्साहात

पाचगणीच्या विकासाचे शिल्पकार नानासाहेब कासुर्डे यांचा अमृतमहोत्सव उत्साहात

पाचगणी प्रतिनिधी -पाचगणीचे माजी नगराध्यक्ष श्री.नानासाहेब कासुर्डे यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस उत्साहात, विविध मान्यवरांच्या व हजारो पाचगणीकरांच्या उपस्थितीत, शुभेच्छा वर्षावात साजरा करण्यात आला. मा. नानासाहेब कासुर्डे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त पाचगणीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

नानाबापू’ नावाने पाचगणीमध्ये प्रसिद्ध असलेले श्री.नानासाहेब कासुर्डे यांनी आजवर पाचगणी शहराचे माजी नागराध्यक्ष, शुभचिंतक नाट्य कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, महात्मा फुले विद्यामंदिर व श्रीमती मीनल बेन मेहता सिनियर कॉलेज, पाचगणी लोकल कमिटीचे अध्यक्ष, घाटजाई नागरी पतसंस्था, पाचगणीचे संस्थापक चेअरमन, पाचगणी व्यायाम मंडळाचे अध्यक्ष अशी विविध पदे भूषवली आहेत, आजही भुषवत आहेत. माझे राजकीय गुरु आणि मार्गदर्शक नानासाहेब कासुर्डे असा नामोल्लेख करत महाराष्ट्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मा.आ. मकरंदआबा पाटील यांनी श्री.नानासाहेब कासुर्डे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.

घाटजाई नागरी पतसंस्थेचा १९ वा वर्धापन दिन साजरा

दिवसभरातील कार्यक्रमांतर्गत घाटजाई नागरी पतसंस्थेचा १९ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. सकाळी सत्यनारायण पूजा करून नागरिकांना महाप्रसाद देण्यात आला. यावेळी पाचगणीतील उत्कृष्ट खातेदार यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी श्री.नानासाहेब कासुर्डे यांनी उभारलेल्या घाटजाई पतसंस्थेच्या माध्यमातून पाचगणी शहराचा विकासात भर पडली असल्याचे गौरवोद्गार अनेक नागरिकांनी केले.

पाचगणीतील शैक्षणिक व क्रीडा स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थांचा गुणगौरव

सायंकाळच्या कार्यक्रमावेळी प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पाचगणी शहरातील विविध शैक्षणिक व क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला. त्यावेळी या विद्यार्थ्यांना विविध बक्षीसे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रमोद पवार यांनी सर्व कार्यक्रमांचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.वाढदिवसानिमित्त गायिका प्रियांका भंडारी यांनी केलेले गायन उत्कृष्ट व मंत्रमुग्ध होते.

पाचगणीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिलीप बगाडे व नगरसेवकांचा सत्कार

श्री.नानासाहेब कासुर्डे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यावेळी पाचगणी नगरपालिकेत विजयी झालेले नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिलीप बगाडे व नगरसेवक यांचे स्वागत करून सर्वांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे श्री.नानासाहेब कासुर्डे यांचा वाढदिवस हा सर्वांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण ठरल्याची चर्चा सगळीकडे झाली.

अनेक मान्यवरांकडून शुभेच्छा वर्षाव

यावेळी साहेबराव बिरामणे, मयूर व्होरा, उद्योजक पंडित, अरुणभाई गोरडिया, राजेंद्र शेठ राजपूरे, आबा भिलारे, विठ्ठल गोळे, प्रवीण भिलारे, राजेंद्र पार्टे, शेखर भिलारे, गजानन कासुर्डे, शेखर कासुर्डे, रफिक सय्यद, आनंदराव पाटील, नितीन बाळासाहेब भिलारे, याशिवाय पाचगणी नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिलीप बगाडे व नगरसेवक तसेच पाचगणी, महाबळेश्वर, वाई, सातारा तालुक्यातील विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांनी श्री.नानासाहेब कासुर्डे यांना भेटून शुभेच्छा दिल्या.

घाटजाई पतसंस्थेचे संचालक मंडळाचे सदस्य रमेश खरात, विजय कांबळे, सचिन वाडकर, दिलीप टेके, अविनाश माने, विजय कासुर्डे, प्रतिभा नितीन कासुर्डे, प्रा.वर्षा सागर कासुर्डे, कल्याणी कांबळे व इतर यांनी सर्व कार्यक्रमांचे उत्कृष्ट नियोजन केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई नगरपालिका भाजपाच्या ताब्यात; दीपकदादा ननावरे ठरले विजयाचे सूत्रधार

Post Views: 192 वाई नगरपालिका भाजपाच्या ताब्यात; दीपकदादा ननावरे ठरले विजयाचे सूत्रधार तरुण –ज्येष्ठांची मोट बांधून दीपकदादा ननावरे यांचा भाजपासाठी

Live Cricket