Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » तांबवे गावास अधिकाऱ्यांची भेट 

तांबवे गावास अधिकाऱ्यांची भेट 

तांबवे गावास अधिकाऱ्यांची भेट 

                              तांबवे – कोयना धरणातुन पाणी सोडण्यात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणुन महापुरबाधीत तांबवे गावास प्रांताधिकारी अतुले म्हेत्रे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, निवासी नायब तहसीलदार बाबुराव राठोड यांनी पुरस्थितीच्या फटका बसणाऱ्या वस्तींची पाहणी केली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, सरपंच शोभाताई शिंदे, ग्रामपंचायत सदस्य धनंजय ताटे, देवानंद राऊत, निलेश भोसले, मंडल अधिकारी एस. जी. काळे, तलाठी सचिन बामणे, ग्रामसेवक निळकंठ कोळी उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी म्हेत्रे यांनी तलाठी, ग्रामसेवक यांनी गावात सतर्क राहण्याच्या सुचना देवुन ज्यांच्या घरात पाणी घुसते त्यांनी काळजी घेवुन सतर्क रहावे, अशा सुचना दिल्या.    

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊसाचा जोर वाढल्याने धरनातुन‌ नदी पात्रात विसर्ग सुरू केल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना नदी पाणी पातळीत‌वाढ‌ होत आहे म्हणून प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी तांबवे गावातील पाहणी‌ केली लोकांना पुरा बाबत माहिती दिली. यावेळी आपत्ती व्यवस्थापन नदी काठावरील पाहणी करून अधिकार्यांना योग्य त्या सूचना दिल्या. पाटण व कराड तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. नद्यांच्या व ओढ्यांच्या पाणी पातळ्यांमध्ये वेगानं वाढ होत आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी सावध रहावे. त्याचबरोबर या दिवसात विनाकारण घराबाहेर जाणं शक्यतो टाळावे .

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उत्कर्षाच्या शिखरावर कार्यक्रमात प्रा नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न. 

उत्कर्षाच्या शिखरावर कार्यक्रमात प्रा नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न.  उत्कर्ष पतसंस्था आयोजित “उत्कर्षाच्या

Live Cricket