स्वराज गजानन चव्हाण याने फलटण येथे झालेल्या थांग टा या स्पर्धेत रौप्यपदक पटकावले
पुसेगाव (नानासाहेब चन्ने )श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ,डॉ. राधाकृष्णन इंग्लिश मिडियम स्कूल पुसेगाव येतील कु.स्वराज गजानन चव्हाण इयत्ता ८वी याने फलटण येथे झालेल्या थांग टा या स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. राज्यस्तरीय वर्धा येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ सुरेश जाधव, उपाध्यक्ष मा. बाळासाहेब जाधव,सचिव मा. मोहनराव जाधव, विश्वस्त,प्रशासकीय अधिकारी डी.पी.शिंदे सर व इन्स्पेक्शन पॅनलचे सर्व सदस्य ,मुख्याध्यापिका,शिक्षक व इतर कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.