सुरूर–पोलादपूर महामार्ग पाचगणीत सुरू असलेल्या कामाची मंत्री मकरंद आबा पाटील यांनी केली पाहणी
पाचगणी प्रतिनिधी : सुरूर–पोलादपूर महामार्गाच्या पाचगणी येथील सुरू असलेल्या रस्ते कामाची पाहणी राज्याचे मंत्री मकरंद आबा पाटील यांनी केली. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेली वर्षभर रखडलेल्या सदर रस्त्यासाठी मंत्री मकरंदआबा पाटील यांनी विशेष लक्ष देऊन संबंधित प्रशासनाच्या यंत्रणेला सूचना दिल्या.
या पाहणीदरम्यान मंत्री मकरंद आबा पाटील यांनी रस्त्याच्या कामाची गुणवत्ता, कामाची प्रगती तसेच नागरिकांना होणाऱ्या सोयी-सुविधांचा आढावा घेतला. काम वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि सूचनाही जाणून घेतल्या. महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित व गतिमान होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.




