Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » वाई तालुका महाराष्ट्र माजी सैनिक संघटनेचा आमदार मकरंद पाटील यांना पाठिंबा

वाई तालुका महाराष्ट्र माजी सैनिक संघटनेचा आमदार मकरंद पाटील यांना पाठिंबा

वाई तालुका महाराष्ट्र माजी सैनिक संघटनेचा आमदार मकरंद पाटील यांना पाठिंबा

देशासाठी लढणाऱ्या सैनिकांचा पाठिंबा हीच माझ्या विजयाची नांदी…आ.मकरंद पाटील

सातारा दि.कॅप्टन उदाजी निकम यांच्या यांच्या आवाहना नंतर वाई तालुका माजी सैनिक संघटनेने आमदार मकरंद पाटील यांना पाठिंबा दिला असून देशाच्या सुरक्षेसाठी जसे जीवाचे रान केले त्याच पद्धतीने मकरंद आबांना निवडून आणण्यासाठी अहोरात्र झटू असा निर्धार माजी सैनिक संघटनेतील सर्व सैनिकांनी केला.

दरम्यान देशासाठी लढणाऱ्या सैनिकांनी पाठिंबा दिल्याने मकरंद आबा मात्र भारावून गेले.

वाईमध्ये झालेल्या माजी सनिकांच्या मेळाव्यामध्ये कॅप्टन उदाजी निकम यांच्या आवाहना नंतर महाराष्ट्र माजी सैनिक संघटनेतील सदस्यांनी आमदार मकरंद पाटील यांना आगामी विधानसभा निवडणुकीत पाठिंबा दिला असून या प्रसंगी आमदार मकरंद पाटील,किसनवीर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन प्रमोद शिंदे,वाई तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुनील शिंदे,उपाध्यक्ष सुभाष सपकाळ, ऑल इंडिया लीगचे अध्यक्ष शामराव राजपुरे,कर्नल आर.डी.निकम सैनिक बँकेच्या संचालिका सौ,वंदना इथापे,यांचेसहीत वाई तालुक्यातील माजी सैनिक उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना वाई तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुनील शिंदे म्हणाले की आमदार मकरंद पाटील यांच्याकडे आम्ही जेव्हा जेव्हा आमच्या प्रश्नांसाठी गेलो त्या प्रत्येक वेळी मकरंद आबा आमच्यासाठी धाऊन आले आणि त्यांनी आमचे सर्व प्रश्न सोडवले. माजी सैनिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे मकरंद आबा म्हणजे खऱ्या अर्थाने आमचे आधारवड आहेत.म्हणूनच ज्या पद्धतीने आम्ही आमचे आयुष्य देशाच्या रक्षणासाठी व्यतीत केले त्याच जिद्दीने आम्ही आमदार मकरंद पाटील यांच्या विजयासाठी अहोरात्र झटनार आहोत.

याप्रसंगी बोलताना आमदार मकरंद पाटील म्हणाले की माझ्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात माजी सैनिक संघटनेच्या पाठिंब्याने होत आहे हीच खरी आपल्या विजयाची नांदी आहे.वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्यातील माजी सैनिकांच्या प्रश्नासाठी मी कायम कटिबध्द असेन अशी ग्वाही ही याप्रसंगी आमदार मकरंद पाटील यांनी दिली.

माजी संचालिका राजश्री घाडगे म्हणाल्या की आमदार मकरंद पाटील यांनी माजी सैनिकांचे अनेक प्रश्न सोडविले आहेत.बहिणीच्या एका हाकेला धाऊन येणारा आमच्या मकरंद आबांसाठी आम्ही सर्व बहिणींनी सुध्दा आबांना विधानसभेत पाठविण्याचा निश्चय केला आहे.आम्ही सर्वजण तिन्ही तालुक्यात आबांच्या विजयासाठी प्रचार करणार आहोत.

या प्रसंगी माजी सैनिक नितीन घाडगे,सुभेदार कृष्णा वाघ,सुभेदार मुरारी ढवळे,हवालदार राजाराम ननावरे,नाईक चंद्रकांत नलावडे,सुभेदार कृष्णा वाघ,सुभेदार मुकुटराव ननावरे,हवालदार धनसिंग जाधव,पांडुरंग सपकाळ,नागेश तावडे, सोपान सोनवणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

सूत्रसंचालन नितीन घाडगे यांनी केले.

आज पर्यंत देशासाठी लढलो आता मकरंद आबांच्या विजयासाठी लढणार आज झालेल्या माजी सैनिकांच्या मेळाव्यात वाई तालुक्यातील सर्वच सैनिकांनी आज पर्यंत आम्ही देशासाठी लढलो,आता आमदार मकरंद पाटील यांच्या विजयासाठी लढणार आणि आबांच्या विजयाचा गुलाल अंगावर घेऊनच या विधानसभा निवडणुकीच्या युद्धाची सांगता करणार असा निर्धार या प्रसंगी उपस्थित असणाऱ्या सर्व माजी सैनिकांनी केला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन

Post Views: 11 गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन महाबळेश्वर : गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक

Live Cricket