Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » भुईंज विभागातील ऊस उत्पादक शेतकर्यांनी आपला जास्तीत जास्त ऊस प्रतापगड साखर कारखान्याकडे गळीतास पाठवावा: आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 

भुईंज विभागातील ऊस उत्पादक शेतकर्यांनी आपला जास्तीत जास्त ऊस प्रतापगड साखर कारखान्याकडे गळीतास पाठवावा: आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 

भुईंज विभागातील ऊस उत्पादक शेतकर्यांनी आपला जास्तीत जास्त ऊस प्रतापगड साखर कारखान्याकडे गळीतास पाठवावा: आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 

यंदाच्या गळीत हंगामासाठी भुईंज विभागातील ऊस उत्पादक शेतकर्यांनी आपला जास्तीत जास्त ऊस प्रतापगड साखर कारखान्याकडे गळीतास पाठवावा असे आवाहन आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

भुईंज विभागातील ऊस उत्पादक शेतकर्यांनी आपला जास्तीत जास्त ऊस प्रतापगड साखर कारखान्याकडे गळीतास पाठवावा: आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

भुईंज :भुईंज तालुका वाई येथील भुईंज विकास सेवा सोसायटीच्या हॉलमध्ये झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते यावेळी मोहनआबा भोसले, भुईंजचे सरपंच विजय वेळे, गजानन भोसले, वाई तालुका भारतीय जनता पार्टीचे नेते संतोषशेठ शिंदे, प्रगतशील शेतकरी राजेंद्र गायकवाड, अजिंक्यतारा उद्योग समूहाचे व्हाईस चेअरमन नामदेव सावंत, माजी चेअरमन सर्जेराव सावंत रामभाऊ जगदाळे, राजू शेडगे, संचालक नितीन शिंगटे, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे शेती अधिकारी विलास पाटील, प्रतापगड साखर कारखान्याचे शेती अधिकारी लालसिंग शिंदे, धनंजय शिंगटे, भुईज मधील प्रगतशील शेतकरी प्रभाकर भाऊ भोसले, भुईंज विकास सेवा सोसायटीचे चेअरमन मदन शिंदे,व्हाईस चेअरमन नारायणराव धुरगुडे, श्रीमंत सुरसिंग जाधवराव, भुईंज चे माजी उपसरपंच प्रशांत जाधवराव, देगाव चे प्रगतशील शेतकरी रमेश इथापे, आदी मान्यवर व वाई तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते. शेतकरी सभासदांच्यावतीने महाराजसाहेबांचे शाल व पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.

यावेळी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शेतकरी बांधवांच्या मागील गळीत हंगामातील ऊसतोडी संदर्भातील समस्या ऐकून घेवून चालु हंगामात सर्व प्रश्न सोडवणार असल्याचे अभिवचन दिले. यंदा वाढीव ऊसतोड कामगार यंत्रणाही देणार असल्याचे सांगितले. येत्या हंगामात शेतातील शेवटचं टीपरं संपेपर्यंत कारखाना बंद करणार नाही, तसेच या भागातून शेतकरयांची कोणतीही कसल्याही प्रकारची तक्रार येता कामा नये अशी कडक शब्दात प्रतापगड कारखान्याच्या संबंधीत ऊस तोडणी यंत्रणा यांची कानउघाडणी केली. व कारखाना प्रशासनास योग्य त्या सुचना दिल्या.

बैठकी दरम्यान आमदार छ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, मी कोणत्याही कारखान्याशी स्पर्धा करणार नाही. इतरांसोबत योग्य तो दर देईन. तुमचा एकही पैसा तुम्हाला द्यायचा ठेवणार नाही असा विश्वास शेतकर्यांना दिला ,तसेच

यंदाच्या गळीत हंगामासाठी या भागातील जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकरयांनी प्रतापगड साखर कारखान्याला ऊस घालावा. जी रीकव्हरी असेल त्या रिकव्हरीप्रमाणे जो दर निघेल तो दर देणार असल्याचेही छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बैठकी दरम्यान जाहीर केले.

ऊस उत्पादक शेतकरी सभासदांनी दिपावलीसाठी साखर मिळावी या मागणीला ही सकारात्मक प्रतिसाद देत.प्रतापगड व्यवस्थापन विषेश बैठक घेवून,संस्थेच्या सद्यपरीस्थीतीवर विचार करून दिपावलीला साखर वाटपसाठी प्रयत्नशील राहील असे आश्वासन दिले.

या सहविचार बैठकीसाठी अजिंक्यतारा-प्रतापगड कारखान्याचे आजी-माजी पदाधिकारी तसेच भुईंज गटातील शिरगाव,देगाव,आसले,जांब,पाचवड,उडतारे,किकली, काळंगवाडी, गोवेदीगर, खोलवडी, वाकणवाडी, मापरवाडी, लगडवाडी , बेलमाची, निकमवाडी, भुईंज, चिंधवली, खडकी, भिवडी, विरमाडे,कळंबे या गावातील ऊसउत्पादक शेतकरी उपस्थीत होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उत्कर्षाच्या शिखरावर कार्यक्रमात प्रा नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न. 

उत्कर्षाच्या शिखरावर कार्यक्रमात प्रा नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न.  उत्कर्ष पतसंस्था आयोजित “उत्कर्षाच्या

Live Cricket