अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » Uncategorized » क्राईम डायरी » उपविभागीय पोलीस अधिकारी कराड यांचे पथकाकडून अवैध वेश्या व्यवसायावर कारवाई

उपविभागीय पोलीस अधिकारी कराड यांचे पथकाकडून अवैध वेश्या व्यवसायावर कारवाई

उपविभागीय पोलीस अधिकारी कराड यांचे पथकाकडून अवैध वेश्या व्यवसायावर कारवाई

कराड प्रतिनिधी -ऑपरेशन मुस्कान अंतर्गत मा.श्री. निखिल पिंगळे पोलीस अधीक्षक साो सातारा, मा. डॉ. वैशाली कडूकर अपर पोलीस अधीक्षक, साो सातारा यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हयामध्ये अवैध वेश्या व्यवसायांवर परिणामकारक कारवायांची मोहिम अधिक तीव्र करण्यात आलेली आहे.

आज रोजी मा. श्रीमती, राजश्री पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड विभाग कराड यांना मौजे तळबीड पोलीस ठाणे हददीतील मौजे विरवडे गावचे हददीतील हॉटेल शुक्रतारा येथे अवैध वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. सदर बातमीचे अनुषंगाने श्रीमती. राजश्री पाटील यांनी तळबीड पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी स.पो.नि. श्री रविंद्र भोरे, श्रीमती शितल पाटील म.पो.उ.नि..पो.उ.नि. काळे, पोलीस अंमलदार, प्रविण पवार, सागर बर्गे, दिपक कोळी, मयुर देशमुख, हर्षल साळुंखे, धनंजय कोळी पुष्पा चव्हाण सचिन गुरव, कुलदिप कोळी, गणेश बाकले, अभय मोरे, तेजस्वीनी मोहिते यांना सदर ठिकाणी छापा कारवाई करणेबाबत आदेशित केले.

त्याप्रमाणे सदर पथकाने हॉटेल शुक्रतारा तळबीड येथे डमी ग्राहक पाठवुन खातरजमा करुन, पंचांसह सदर ठिकाणी छापा कारवाई केली असता, तेथे हॉटेल मॅनेजर सुरज मारुती सावंत वय -27,रा. भिकवडी, ता. कडेगाव जि. सांगली दोन पिडीत महिला यांचे करवी अवैध वेश्या व्यवसाय चालवित असताना मिळुन आले. सदर कारवाईमध्ये मिळुन आलेल्या दोन परराज्यातील पिडीत महिलांची सुटका करुन, शुक्रतारा तळबीड पोलीस ठाणेस अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदयांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप कराड तालुका पोलीस ठाणे करत आहेत.

अवैध वेश्या व्यवसाय चालविणारे गुन्हेगारी प्रवृत्तींचे इसमांविरुध्द यापुढे देखील कायदेशीर कारवाया सुरु राहणार असल्याचे मा. पोलीस अधीक्षक साो निखिल पिंगळे मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी स्पष्ट केले. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग श्रीमती राजश्री पाटील यांचे व कारवाई पथकातील अधिकारी अंमलदार यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket